आण्णासाहेब कोळी यांची कोळी महासंघाच्या विशेष निमंत्रित सदस्य पदी नियुक्तीj

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

सचिन मंगरुळे 
म्हसवड : प्रतिनिधी :

कोळी समाज संघटनांची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लोणावळा येथे राज्यस्तरीय महासभा मा. आमदार रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या महासभेला महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून कोळी महासंघाचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कोळी महासंघाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा आमदार रमेशदादा पाटील यांनी हिंगणी ता. माण जिल्हा सातारा येथील आण्णासाहेब कोळी यांची विशेष निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती जाहीर केली.

यावेळी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, देवानंद भोईर तसेच महाराष्ट्र प्रदेश युवा प्रदेशाध्यक्ष अॅड. चेतन दादा पाटील, सहसचिव सतीश धडे यांसोबत विविध पदाधिकारी उपस्थित होते.

अण्णासाहेब कोळी यांचा संपूर्ण राज्यामध्ये चांगला जनसंपर्क आहे. त्यांनी मंत्रालयामध्ये, शासकीय, प्रशासकीय तसेच पत्रकार व राजकीय, सामाजिक संघटनेमध्ये राज्यस्तरीय विविध पदांवरती उत्कृष्ट काम केलेचा अनुभव असल्याने त्यांची कोळी महासंघाच्या राज्यस्तरीय कमिटी वरती नियुक्ती केली आहे.

या नियुक्तीबद्दल आण्णासाहेब कोळी म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील व अँड. चेतनदादा पाटील व कोळी महासंघाने दिलेली राज्यस्तरीय जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून संपूर्ण राज्यांमध्ये कोळी समाज बांधव एक संघ करण्यास व त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे कोळी यांनी यावेळी सांगितले.

महासंघाच्या राज्यस्तरीय विशेष निमंत्रित सदस्य पदी आण्णासाहेब कोळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!