इंजि सुनील पोरे यांचा देशविदेशातील सकल पोरे बांधवकडून सामाजिक कार्याबद्दल हडपसर येथे मानपत्र देऊन सत्कार*…

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
     मी पोरे परिवारातील सदस्य आहे म्हणून मला अभिमान आहे या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन समस्त पोरे समाज बांधव कार्यकारणीच्या वतीने करण्यात आले असून या बहारदार कार्यक्रमात म्हसवड मधील सामाजिक कार्यकर्ते इंजि. सुनील पोरे यांचा व जेष्ठ विधीतज्ञ ऍड विश्वनाथ टाळकुटे मुंबई हायकोर्ट यांचा सर्व समाजातील त्यांच्या सर्वस्रेष्ठ सामाजिक कार्याबद्दल दोघाना मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे

         समस्त पोरे परिवाराच्या वतीने १९ मे २०२४ रविवार रोजी पोरे परिवार स्नेह मेळाव्याचे आयोजन ना.स.प अध्यक्ष श्री संजयजी नेवासकर व श्रीमती उषाताई तुपसाखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री नामदेव मंदिर नामदेव सेवा संघ काळे पडळ पोलीस चौकी शेजारी तुकाई टेकडी पायथा हडपसर पुणे येथे करण्यात आले आहे या प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याबत प्रसिद्धी पत्रक काढून आयोजक श्रीमती उषाताई पोरे,श्री राजेंद्र पोरे,शकुंतलाताई पोरे,मनोज पोरे ,रविकांत पोरे ,संतोष पोरे,वैभव पोरे, यांनी सर्व पोरे समाजाला या स्नेह मेळाव्याकरिता आमंत्रीत केलेआहे या पत्रकात म्हटले आहे की
     आपला पोरे परिवार अत्यंत मोठा आहे परंतु व्यवसाय, नोकरी अशा अन्य कारणामुळे देश विदेशात स्थलांतरीत झाला आहे आपण जवळचे असुन स्थलांतरीत झाल्यामुळे आपली संस्कृती संस्कार कुलाचार भाऊ घराणे याबाबत काही गोष्टीची यथासांग माहिती थोडीशी मागे पडली आहे याला उजाळा मिळावा म्हणून आम्ही संयोजक कमिटी याबाबत आपण सर्वांनी एकत्र येण्यासाठी गेले २/३ वर्षे प्रयत्नशील आहोत परंतु काही कारणामुळे विलंब होत होता त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून दिनांक १९ मे २०२४ रविवार रोजी पोरे परिवार स्नेह मेळावा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आयोजित करीत आहोत यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. यासाठी आपले परिचित सर्व पोरे बांधवांना सस्नेह निमंत्रित करीत आहोत


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!