समाजाच्या नावावर ५ वेळा निवडून आलेल्या अनंत गीते यांनी ३० वर्षांचा कामाचा लेखाजोगा समोर आणावा – खासदार सुनिल तटकरे
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
रायगड
सुशील यादव
म्हसळा :प्रतिनिधी
देशात होणाऱ्या ५ टप्प्यातील लोकसभा निवडणूका जसजशा जवळ येवू लागल्या आहेत तसतसा राजकीय पक्षांचा निवडणूक प्रचार सभा व बैठकांचा जोर वाढला आहे.तिसऱ्या टप्प्यातील ७ मे रोजी पार पडल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या ३२ रायगड लोकसभा निवडणुकीत सेना,भाजप युती मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे उमेदवार आहेत तर त्यांचे विरूद्ध इंडी आघाडीचे उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार माजी खासदार अनंत गीते यांच्यात थेट लढत होणार आहे.
अटीतटीच्या लढतीत आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.दिनांक ३१ मार्च रोजी श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा,तळा आणि श्रीवर्धन मुंबई निवासी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना कार्यकर्ता व पदाधिकारी यांचा तालुकानिहाय निर्धार मेळावा मुंबई दादर येथील श्री कृष्ण सभागृहात पार पडला.

मेळाव्याला युतीचे उमेदवार म्हणून खासदार सुनिल तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना इंडी आघाडीचे अनंत गीते माझ्यावर मा.पवार साहेब आणि बॅ.अंतुले यांचा विश्वासघात केला असल्याची टिका करतात यावर तटकरे यांनी सडेतोड उत्तर देताना टिका टिपण्णी करणे माझा धर्म नाही पण वेळेला नेतृत्वात बदल झाला असेल तर लोकांची सेवा करण्यासाठी नेतृत्त्वात बदल हे होतच असतात.आम्ही विकासाचे नविन पर्व,चालना देण्यासाठी आणि बहुजनांच्या व्यापक हितासाठी राजकिय सत्तेत आलो आहोत असे स्पष्ट करताना तुम्हाला लोकांनी ५ वेळा निवडून खासदार व मंत्री केले असे असताना तुम्ही विकास न करता जनतेचा विश्वासघात केलात.कुणबी समाजाचे नावावर निवडून आलात पण हे करत असतानाच तुम्ही स्वतःचे सावलीला घाबरलात.समाजाचा एकही मोठा कार्यकर्ता घडवला नाहीत.तुम्हाला वाटत दुसरा मोठा झाला तर माझे काय होईल असाच त्या मागिल उद्देश असावा असा राजकीय घणाघात तटकरे यांनी केला.
मी माझे कार्यकाळात कुणबी समाजाचे नेतृत्वाला वेगवेगळया संस्थांवर विराजमान केले आहे या वेळी तटकरे यांनी व्यासपीठावरील अनेजणांची पद निहाय नावे सांगितली.विरोधी उमेदवार अनंत गीते यांनी समाजाच्या नावावर ५ वेळा खासदार,१० वर्षे केंद्रीय मंत्री तेही कॅबिनेट अशा प्रदीर्घ ३० वर्षांच्या मागील कामाचा लेखाजोगा समोरा समोर आणावा मी माझ्या ५ वर्षांचा लेखाजोगा समोर ठेवतो म्हणजे लोकांशी विकासाची गल्लत कोणी केली ते निदर्शनात येईल असा खुलासा खासदार सुनिल तटकरे यांनी या वेळी केला.


