राष्ट्रीय सेवा योजना व्यक्तिमत्व घडवते. – मा. प्रा. सुभाष कांबळे
व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
कुलदिप मोहिते
कराड: (, प्रतिनिधी)
” ‘राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे व्यक्तिमत्व घडवण्याचे काम तर करतेच त्याबरोबर दत्तक गाव योजनेद्वारे गावच्या विकासाला गतीही देते. गावच्या विकासाला चालना देण्याचे काम स्वयंसेवकाच्या हातून होणे हेच दत्तक गाव योजनेचे उद्दिष्ट आहे. स्वयंसेवक गावाकडून वैचारिक भान घेत असतात तर गाव स्वयंसेवकाच्या श्रमातून आपले रूप पालटत असते.'” असे प्रतिपादन मा. प्रा. सुभाष कांबळे (भूगोल विभाग प्रमुख, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड ) यांनी केले. ते मौजे किवळ येथे आयोजित केलेल्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या सिनिअर विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” प्रबोधनपर कार्यक्रमात ‘राष्ट्रीय सेवा योजना आणि दत्तक गाव’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री प्रल्हाद बाबुराव जाधव हे होते. ते म्हणाले की, ” राष्ट्रीय सेवा योजनेमुळेच आदर्श नागरिक घडून गावाचा विकास करण्याचे बळ मिळते. .”


