म्हसवड च्या सिद्धनाथ मंदिरात श्री रामाच्या जयघोषात राम लल्लाची मूर्ती सिंहासनावर विराजमान
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
दिलीपराज कीर्तने
म्हसवड: प्रतिनिधी
आज 22 जानेवारीला अयोध्येत दुपारी बारा वाजून 29 मिनिटांनी प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार होती या पार्श्वभूमीवर म्हसंवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरात प्रभू रामचंद्र ,सीतामाई व लक्ष्मण तसेच हनुमान व श्री भोलेनाथ शंकर यांच्या मूर्ती मोठ्या जल्लोषात व श्रीरामाच्या जयघोषात सिंहासनावर विराजमान करण्यात आल्या.

दरम्यान, एक आठवडा अगोदर पासून सिद्धनाथ मंदिर गाभाऱ्यापासून प्रदक्षिणा मार्ग तसेच संपूर्ण मंदिर परिसर झाडून स्वच्छ करून धुवून घेण्यात आला होता या कामांमध्ये आमदार जयकुमार गोरे यांनीही कार्यकर्त्यांसह आपला सहभाग नोंदवला होता .त्यानंतर गाभारा, हत्ती मंडप,प्रदक्षिणामार्ग, मंदिर परिसर आणि शिखर यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती आजच्या दिवशी मंदिर परिसरातील सर्व गुरव समाजाच्या घरोघरी आकर्षक रेखीव रांगोळ्या काढून उंच गुढ्या उभारण्यात आल्या होत्या .सर्व परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते .सकाळपासून मंदिरामध्ये विविध मंडळांचे भजनाचे कार्यक्रम सुरू होते त्यानंतर सकाळी साडेदहाच्या दरम्यान शहराच्या मुख्य पेठेतून श्री प्रभू राम ,सीता ,लक्ष्मण हनुमंत आणि श्री शिवशंकर यांच्या मूर्ती ढोल ताशांच्या गजरासह “जय श्रीरामाच्या “जयघोषात मिरवणूक काढण्यात आली.


