राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर याना शिक्षक  आयोजित आक्रोश महामोर्चाचे निवेदन  सादर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित आक्रोश महामोर्चाचे निवेदन माण तालुका शिक्षक समितीचे वतीने माजी कॅबिनेट मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर याना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे होणाऱ्या महाक्रोश मोर्चाचे केले आहे .
      सततच्या ऑनलाइन माहित्या, व अन्य अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाची हेळसांड होत आहे. शिक्षकांना शिकवू द्या… विद्यार्थ्यांना शिकू द्या…,राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करावी  या आणि अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा यासाठी माण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष संतोष घोडके , शिक्षक नेते प्रताप अडसर,जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत दोरगे, संचालक एम डी दडस,  नितीन काळे,प्रवक्ते सुशील त्रिगुणे,कोशाध्यक्ष प्रमोद मंगरुळे  यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!