सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित, ७ वी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम किल्ले भूषणगड

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड

“आपले किल्ले आपली जबाबदारी” अनुषंगाने सातारा पोलीस दलामार्फत किल्ले भूषणगड, ता. खटाव या ठिकाणी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेमध्ये दहिवडी उपविभागातील उपविभागीय कार्यालय तसेच दहिवडी, म्हसवड, औंध, वडूज या पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. तसेच सातारा पोलीस दलातर्फे सदर मोहिमेबाबतची लिंक प्रसारित करण्यात आल्यामुळे सातारा जिल्हयातील नागरीक देखील मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते. सदर मोहिमेदरम्यान किल्ले भूषणगड पायथा येथे एकत्रीत येवून चढाई (ट्रेक) करण्यात आली तसेच समुह तयार करुन किल्ले भूषणगड येथे नियोजनबध्द स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

सदर मोहिमेदरम्यान गड पायथा परिसर, तलाव परिसर, महादरवाजा परिसर तसेच हरणाई मंदिर परिसरात स्वच्छता करुन जैविक व अजैविक असा अंदाजे १२५ किलो कचरा गोळा करण्यात आला. गडावर हरणाई मंदिराच्या सभा मंडपात सर्वांना एकत्रित करुन शिवप्रेमी . मानसिंग कदम, कवठे महाकाळ, सांगली यांनी भूषणगडाबद्दल माहिती दिली. सदर मोहिमेमध्ये . समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा,  कमलेश मिना, परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक, श्रीमती अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग कॅम्प वडूज, . अजय कोकाटे,परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक. डी.पी. दराडे, स.पो.नि. औंध पो. ठाणे, . राजकुमार. भुजबळ, स.पो.नि. म्हसवड पो. ठाणे,  अक्षय सोनावणे, स.पो.नि. दहिवडी पो. ठाणे, पोलीस उपनिरीक्षक .जी.बी. केंद्रे, औंध पोलीस ठाणे वगैरे असे १५ पोलीस अधिकारी, ४० पोलीस अंमलदार व १५० नागरीक, सामाजिक कार्यकर्ते व विदयार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. दिनांक १५/०१/२०२३ रोजी पासून सातारा पोलीस दलामार्फत आयोजित आपले किल्ले आपली

 

जबाबदारी मोहिमेअंतर्गत   १ ) अजिंक्यतारा (दि १५/०१/२०२३),  २) वसंतगड (दि. २२/०१/२०२३),  ३) जरंडेश्वर (दि२९/०१/२०२३), ४) वैराटगड (दि०५/०२/२०२३), ५) संतोषगड(दि०५/०३/२०२३),  ६) दातेगड (सुंदरगड) (दि१६/०४/२०२३),  ७)भूषणगड (दि०४/०६/२०२३) या ठिकाणी गड मोहिम व स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्या असून मोहिमेत आज अखेर १०२ पोलीस अधिकारी, ५६३ पोलीस अंमलदार, १८४० नागरीक व विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवून एकुण अंदाजे ८२९ किलो कचरा गोळा करुन योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे. सातारा पोलीस दलामार्फत प्रत्येक रविवारी सातारा जिल्हयातील एक किल्ला निवडून सदरची मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये नागरिक, व्यापारी व तरुणांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आव्हानही सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नवीन पिढीमध्ये इतिहासाबद्दल जनजागृती होण्यास देखील मदत होणार आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!