आण्णासाहेब कोळी यांची महाराष्ट्र पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुख पदी पुनश्च: निवड
व्हिजन २४ तास न्यूज
Ahmad Mulla Mhaswad
पत्रकार Times : मुंबई (विशेष प्रतिनिधी)
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या केंद्रीय कार्यालयातून सन 2023 या वर्षाकरिता जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पत्रकार पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये महाराष्ट्र पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुख पदी आण्णासाहेब कोळी यांची सर्वानुमते निवड महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर सर यांनी जाहीर केली आहे.
हिंगणी ता.माण जिल्हा सातारा येथील आण्णासाहेब कोळी हे गेले 22 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्कृष्टपणे कार्यरत आहेत. मोठमोठ्या विविध दैनिकांमध्ये त्यांनी प्रतिनिधी-पत्रकार म्हणून काम पाहिले आहे. सद्या ते पत्रकार टाइम्सचे संपादक म्हणून कार्यरत आहेत.यासोबतच त्यांनी मंत्रालयामध्ये विधान परिषद सदस्य तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पहिले आहे.
सद्या ते विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय, मंत्रालयीन कामकाज पाहत आहेत.यासोबतच महाराष्ट्रामध्ये महायुतीचे घटक संघटना असलेल्या कोळी महासंघामध्ये राज्य कार्यकारिणी सदस्य अशा विविध पदांवर ते सध्या कार्यरत आहेत. संपूर्ण राज्यभर त्यांचा जनसंपर्क असल्याने,याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र पत्रकार संघाने त्यांची राज्य संपर्क प्रमुख पदी निवड केली आहे.या निवडीबद्दल त्यांचे राजकीय,सामाजिक,उद्योग, प्रशासकीय,पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.