सैनिक फेडरेशनच्या कोरेगाव तालुका अध्यक्षपदी संतोष भोसले; अशोक नलवडे जिल्हा उपाध्यक्ष

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते 

कोरेगाव :प्रतिनिधी

सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनच्या वतीने २३ नोव्हेंबर रोजी कोरेगाव येथे आयोजित पुनर्गठन बैठकीत जिल्हा उपाध्यक्षपदी अशोक नलवडे, तर कोरेगाव तालुका अध्यक्षपदी संतोष भोसले यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी कार्याध्यक्षपदी अमोल खताळ, उपाध्यक्षपदी अय्याज इनामदार, सुधाकर घोरपडे व मनोज चव्हाण, सचिवपदी यशवंत शिंदे, संघटकपदी अशोक ढोले, तर कार्यकारिणी सदस्यपदी माणिक शिंदे यांची निवड झाली.

बैठकीत माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय व शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडवणे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच पोलिस, महसूल व अन्य विभागांतील अडचणींवर मार्ग काढण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यातील माजी सैनिकांना संघटित करून सैनिक फेडरेशन अधिक मजबूत करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांनी केले.

यावेळी जिल्हा सचिव सदाशिव नागणे, कराड तालुका उपाध्यक्ष हणमंत मडकई यांच्यासह माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. प्रास्ताविक अशोक नलवडे यांनी केले, तर आभार संतोष भोसले यांनी मानले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *