संपादक डॉ.मोहम्मद आरेफ खान पठाण यांना दिल्लीतील २ पुरस्कार जाहीर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

नांदेड / अर्धापूर :- उध्दव सरोदे –

दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड आणि द पायोनियर अवॉर्ड २०२६ या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात नांदेड येथील रहिवाशी दैनिक ‘नांदेड चौफेर’चे संपादक तथा मौलाना आझाद मायनॉरिटी मिशनचे संस्थापक डॉ.मोहम्मद आरेफ खान पठाण यांना उत्कृष्ट पत्रकारिता आणि उत्कृष्ट एनजीओ कार्य असे २ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

दिल्ली येथील हॉटेल सहारा स्टारमध्ये ६ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित भव्य सोहळ्यात त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.डी-पिटा चॅरिटेबल ट्रस्ट आणि फिल्मोरा मीडिया नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात डॉ. मोहम्मद आरेफ खान पठाण यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मंदाकिनी यांच्या हस्ते तर उत्कृष्ट एनजीओ कार्याचा पुरस्कार पाकिस्तानी अभिनेत्री हिबा बुखारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिलेश सिंह करणार असून पत्रकारिता क्षेत्रातून जनसामान्यांचे प्रश्‍न मांडण्याबरोबरच सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी कार्यरत असलेल्या डॉ.मोहम्मद आरेफ खान पठाण यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात असल्याने हा सन्मान नांदेडसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

              पत्रकारिता आणि सामाजिक कार्य अशा दोन्हीं क्षेत्रांतील योगदानाची पुरस्कारांच्या माध्यमातून दखल घेतली जाणार आहे.६ डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणार्‍या या पुरस्कार सोहळ्यात चित्रपट,टेलिव्हिजन,पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असून उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येणार आहे.हे दोन्हीं पुरस्कार डॉ. मोहम्मद आरेफ खान पठाण यांना जाहीर होताच संपूर्ण नांदेड जिल्ह्यासहित मराठवाडा,महाराष्ट्र व देशभरातुंन त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *