वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; इंदोली येथे ‘ज्ञानगंगा’ गटाच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम व जनजागृती रॅली उत्साहात संपन्न!
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
इंदोली उंब्रज (प्रतिनिधी):
कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र बी.एड. महाविद्यालय, इंदोली येथील ‘ज्ञानगंगा’ गटाच्या छात्र-अध्यापकांद्वारे शालेय आंतरवासिता टप्पा क्रमांक २ या प्रात्यक्षिक उपक्रमांतर्गत दि. २१ सप्टें. २०२६ रोजी वृक्षारोपण उपक्रम व पर्यावरण जनजागृती रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
पर्यावरण संवर्धन आणि वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी छात्र-अध्यापकांनी गावात जनजागृती रॅली काढली. या रॅलीद्वारे ग्रामस्थांना वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर स्मारक परिसर व जिल्हा परिषद शाळा, इंदोली येथे विविध झाडांची रोपे लावून हरित व सुंदर परिसर निर्मितीचा संकल्प सोडण्यात आला.
हा उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल, इंदोलीचे मुख्याध्यापक श्री. घाडगे सर, श्री नृसिंह शिक्षण प्रसारक मंडळ इंदोली या संस्थेचे प्रशासक श्री. गौरव निकम सर, कै.रामराव निकम शिक्षणशास्त्र (बी.एड ) महाविद्यालय इंदोलीचे प्राचार्य व मार्गदर्शक प्राध्यापक श्री. पाटील सर, प्रा. बोर्डे मॅडम, प्रा. देसाई मॅडम, तसेच मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा इंदोली पूर्वन सौ. जाधव मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडला.
या प्रसंगी इंदोली गावचे माजी मुख्याध्यापक श्री. सिकंदर मुल्ला सर, माजी सरपंच श्री. धनाजी वाघ आणि श्री. भरत निकम या ग्रामस्थांची विशेष उपस्थिती लाभली. न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आणि ‘ज्ञानगंगा’ गटातील सर्व छात्र-अध्यापकांनी या उपक्रमात अत्यंत उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवला.
“वृक्ष लावा, वृक्ष जगवा; पर्यावरणाचे रक्षण करा!” या सामाजिक संदेशासह पार पडलेल्या या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्रशासक, मार्गदर्शक प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, विद्यार्थी व ज्ञानगंगा गटाच्या छात्र-अध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.

