आमदार मनोजदादांचा वडगावात भव्य सत्कार — एका वर्षात 760 कोटींची विकासभरारी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड:प्रतिनिधी
कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार श्री. मनोजदादा यांच्या आमदारकीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वडगाव येथे आयोजित सत्कार व स्थानिक विकास निधीतून मंजूर विकासकामांच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गावकऱ्यांच्या उपस्थितीने गजबजलेल्या या कार्यक्रमात विकासाचा वेग, नेतृत्वाची बांधिलकी आणि नागरिकांचा विश्वास याचे दर्शन घडले.

या कार्यक्रमात बोलताना आमदार मनोजदादा म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी याच वडगावात झालेल्या कार्यक्रमात चोरे–इंदोली उपसा सिंचन योजनेची मागणी मोठ्या प्रमाणात झाली होती. आज त्या योजनेची निविदा लवकरच निघणार असल्याने वडगावची भूमी भाग्यवान आहे, असे त्यांनी नमूद केले. ऍड. विनायकराव पाटील बापू जनसेवा संघटनेने घेतलेल्या निर्णयामुळे झालेला परिवर्तनाचा प्रवाह संपूर्ण मतदारसंघात पोहोचला आणि त्यातूनच कराड उत्तरमध्ये तब्बल त्रेचाळीस हजार मताधिक्याने निवडून येण्याचा विश्वास मतदारांनी दाखवला, याबद्दलही त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. वडगावने चारशेहून अधिक मतांची लीड दिल्याबद्दल दादांनी गावकऱ्यांचे विशेष आभार मानले.

स्व. ऍड. विनायकराव पाटील बापू आणि स्व. संभाजीराव आबा यांनी त्यांच्या कार्यकाळात वडगावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत रणजित अप्पा व जनसेवा संघटनेचे सर्व सहकारी हे कार्य पुढे नेत आहेत, असे आमदार दादांनी गौरवपूर्ण शब्दांत सांगितले. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून मागील दोन वर्षांत वडगावसाठी सुमारे 65 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर पुढील काळातही वडगावसाठी लागेल तेवढा निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

आपल्या सर्व लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय हे आपले सरकार दृढपणे राबवत असून बहिणींनी निश्चित राहावे, त्यांच्या पाठीशी सरकार ठाम उभे आहे, असेही ते म्हणाले. किसान सन्मान निधीमधील 2000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत आणि साडेसात HP पंपांचे वीजबिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे शेतीपंप कनेक्शन तोडू नये, अशी स्पष्ट सूचना त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

यावेळी प्रास्ताविकात कराड उत्तर भाजपाचे उपाध्यक्ष रणजित पाटील यांनी मनोजदादांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत वडगावमध्ये झालेल्या उल्लेखनीय कामांचा आढावा घेतला. मनोजदादा आमदार झाल्यापासून मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याला आपणच आमदार झाल्याचा आनंद होत असून त्यांच्या कार्यकाळात पाल–चोरे उपसा सिंचन योजना, हाणबरवाडी–धनगरवाडी योजना, शामगावचा पाणीप्रश्न, उंब्रज सेगमेंट पूल अशा मोठ्या प्रश्नांची यशस्वीपणे उकल झाली. रस्ते, सभामंडप, गटारे, आरोग्य दवाखाने, डीपी समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक विकासकामांचा वेग अबाधित ठेवत मनोजदादांनी अवघ्या एका वर्षात तब्बल 760 कोटींच्या विकासकामांची ऐतिहासिक कामगिरी साध्य केली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी मोफत मोतीबिंदू शिबिरे व नेत्रतपासणी शिबिरेही सतत चालू ठेवली आहेत.

कार्यक्रमात बाळासाहेब साळुंखे दादा, मदन काळभोर, नयन पैलवान, देवदत्त माने, सरपंच चरेगाव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. कृष्णतः जाधव यांनी केले.
या सोहळ्यास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील तात्या, निवासराव निकम अप्पा, मोहनराव माने, धनाजी माने, शहाजीराव देशमुख, योगीराज सरकाळे, शंकरराव शेजवळ काका, संतोष पाटील, गणेश जाधव, शंकर चंदुगडे, शहाजी मोहिते, कमलाकर शेजवळ, नारायण पाटील, प्रशांत भोसले, विश्वास काळभोर, सुनील काळभोर, वडगाव विकास सेवा सोसायटीचे संचालक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जनसेवा संघटनेचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

विकासाचा वेग, नेतृत्वाची दृष्टी आणि जनतेचा विश्वास यांचा संगम ठरलेला हा वडगावातील कार्यक्रम कराड उत्तरच्या विकासयात्रेतील एक उल्लेखनीय टप्पा ठरला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *