व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड दि. २७
म्हसवड येथील दत्तनगर येथे आपल्या कुटुंबासह रहात असलेल्या यशोधन दिलीप माने यांच्या बंद घराला आतुन लावलेली कडी काढुन घरात प्रवेश करुन अज्ञाताने घरातील कपाटातुन रोख रक्कमेसह २ लाख ९५ हजार रुपयांचे दागीने चोरुन पोबारा केल्याची घटना घडली असुन या घटनेमुळे म्हसवड शहरात खळबळ उडाली आहे.
या बाबत म्हसवड पोलिस स्टेशन मधुन समजलेली अधिक माहिती म्हसवड शहरातील दत्तनगर परिसरात यशोधन दिलीप माने हे आपल्या कुटुंबासह रहावयास आहे, दि.२६ रोजी रात्री ते जेवन करुन झोपी गेले या दरम्यान पहाटे साडे ४ च्या दरम्यान त्यांच्या घराच्या दरवाजाला आतुन लावलेली कडी अज्ञातांनी दरवाजाच्या फटीतुन बारीक काठीच्या साह्याने काढून घरात प्रवेश मिळवला घरात गेल्यानंतर त्यांनी घरातील कपाटात ठेवलेले रोख १० हजार रुपये व कपाटातील दागिने यामध्ये ४ तोळ्याचा १ लाख ४० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, ३५ हजार रुपये किमतीचे १ तोळ्याचे सोन्याचे गंठन, २० हजार रुपये किमतीची अर्धा तोळ्याची सोन्याची चेन, ३५ हजार रुपये किमतीच्या दोन वेढ्याच्या अंगठ्या, ३५ हजार रुपये किमतीची एक डिजाइन ची अंगठी, व यशोधन माने यांचा पासपोर्ट असा एकुण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
दि. २७ रोजी सकाळी जेव्हा यशोधन माने यांच्या घरातील सदस्यांना घरातील कपाट उघडे दिसले तेव्हा त्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी कपाटातील सोन्याची तपासणी केली असता कपाटातील सोने गायब झाल्याचे लक्षात येताच यशोधन माने यांनी त्वरित घटनेची खबर म्हसवड पोलीस स्टेशन ला दिली सदर ची माहिती मिळताच म्हसवड पोलीस स्टेशन ते स.पो.नि. सखाराम बिराजदार यांनी पोलीस पथकासह घटनास्थळाला भेट देत सर्व ठिकाणची माहिती घेत घटना स्थळाचा पंचनामा करुन याची माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांना दिली. तर सदरच्या घरफोडीची माहिती मिळताच उपविभागिय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी तात्काळ म्हसवड येथे येवुन घटनास्थळाला भेट दिली व तपासाच्या सुचना दिल्या असुन अधिक तपास सपोनि सखाराम बिराजदार करीत आहेत.