रस्त्यावरील विद्युत वाहक तारेचा स्पर्श झाल्यामुळे ट्रॅक्टरमधील वैरण जळून खाक: रस्त्यावर बर्निग ट्रॅक्टरचा थरार
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड,
खडकी ता माण येथील शेतकरी संजय खांडेकर जनावराच्या चाऱ्यासाठी मका पिकाचा वाळलेला कडबा ट्रॅक्टरच्या दोन ट्राॅली भरून म्हसवड कडून लोणार खडकी कडे निघालेला असताना पोलीस स्टेशन जवळ ट्रॅक्टर-ट्रॉलीस रस्त्यावरुन आडवी गेलेल्या विजेच्या वीजप्रवाहित तारेस स्पर्श झाल्याने आग लागून दोन ट्रॉल्या कडबा जळून खाक झाल्याची घटना सायंकाळी सहा वाजणेच्या दरम्यान येथील मार्केट यार्ड समोरील रस्त्यावर घडली.या आगीत सत्तर ते ऐंशी हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे
याबाबत अधिक माहिती अशी काल सायंकाळी सहाच्या सुमारास संजय खांडेकर हे जनावरांसाठी वाळलेल्या मक्याची वैरण दोन ट्रॉल्या भरलेला ट्रॅक्टर (एमएच ०९ डीपी ११०८) ने म्हसवड येथून पाच किलोमीटर अंतरावरील लोणार खडकी कडे निघाले होते . येथील पोलिस ठाणे नजीकच्या रस्त्याकडेला विजेचा ट्रान्सफॉर्मर असून, या ट्रान्सफॉर्मरवरुन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला जोडलेल्या विद्युत वाहक तारा आहेत या विजेच्या तारा खूपच कमी उंचीवर असल्यामुळे वीजप्रवाहित ताराखालून ट्रॅक्टर वाळलेला कडबा भरून जात असताना कडब्यास वीजप्रवाहित तारेचा स्पर्श झाला व दोन्ही ट्रॉल्यांमधील कडव्यास आग लागली.
याची ट्रॅक्टर ड्रायव्हरला कसलीही कल्पना नव्हती पेटलेल्या वैरणीसह रस्त्याने ट्रॅक्टर जातअसताना चांडवले यांच्या कापड दुकानात बसलेल्या फुटाणे यांनी व आपल्या शेतात काम करत असलेले सकाळचे प्रतिनिधी सलीम पटेल यांनी जळत चालेला ट्रॅक्टर पाहिला व त्वरीत ट्रॅक्टर थांबवून वैरण पेटल्याचे सांगीतले चालकाच्या निदर्शनास ही बाब येताच त्याने दोन ट्रॉलीस जोडलेला ट्रॅक्टर विभक्त केला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली व ट्रॅक्टरचेही नुकसान झाले नाही; परंतु दोन्ही ट्रॉल्यांमधील कडव्यास लागलेली आग वाढत गेली.आग एवढी भयंकर होती की यामुळे सर्वत्र आगीच्या उंच ज्वाला व धुराने घटनास्थळाचा संपूर्ण परिसर माखून गेला. या घटनेची सलीमभाई पटेल यांनी म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना फोनवरुन माहिती दिली सपोनि भूजबळ यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरीत अग्निशमन यंत्रणेचा ड्रायव्हर प्रवीण पिसे व रुग्ण वाहिकेला फोन केला आणी कोणी कल्पनाही करणार नाही इतक्या तातडीने पाच मिनीटाच्या आत घटनास्थळी प्रथम म्हसवड पालिकेचा अग्निशमन बंब सोबत रुग्णवाहिका हजर झाली याबरोबरच समक्ष पोलिस फौजफाट्यासह सपोनि भूजबळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली ट्रॅक्टरसह दोन्ही ट्रॉल्यांमधील कडब्यास लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले
आग विझवण्यात प्रवीण पिसे ,सनी शेटे यांनी मोलाची कामगिरी केली
विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जी पणामुळे ही मोठी दुर्घटना घडली असल्याची लोकांची चर्चा