अग्नीशस्त्र व सराफी व्यवसायीकाला लुटणारे दरोडेखोरांसह, फरार आरोपी जेरबंद शाहुपूरी गुन्हे शाखेअग्नीशस्त्रासह 2लाख,82हजार,750/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगतची मोठी कारवाई.
व्हिजन २४ तास (मुख्य संपादक: अहमद मुल्ला )
By:सादिक शेख( पोलीस टाईम्स रिपोर्टर )
गोंदवले खुर्द:प्रतिनिधी
दि.१९ मार्च/२०२३ रोजी रात्रौ. ९.३० वा. चे सुमारास शाहुपूरी – दिव्यनगरी रोडवरील हिंदवी पब्लीक स्कुलचे कॉर्नरजवळ शनिवार पेठ,सातारायेथील एका सराफी व्यवसायीकास अज्ञात इसमांनी इंडीका कार आडवी मारुन त्यास थांबवुन सराफी व्यवसायीकास चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील बॅग जबरदस्तीने हिसकावुन घेवुन गाडीतुन पळुन गेले होते. म्हणुन यातील तक्रारदार यांनी तक्रारी वरुन शाहुपूरी पोलीस ठाणे, सातारा येथे गुरनं. 85/2023 भादविसंक ३९२.३४. प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
सदरचा गुन्हा घडले नंतर सराफी बाजारपेठेत भितीचे वातावरण निर्माण झाले होते.नमुद गुन्हा दाखल झाले नंतर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.बापु बांगर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश किंद्रे यांनी पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे यांना नमुद गुन्हा उघडकीस आणुन आरोपींना पकडणे बाबत सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे मा.पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे यांनी शाहुपूरी पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे व गुन्हे प्रकटीकरण
शाखेच्या स्टाफला नमुद गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या. त्यानंतर शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन गुन्हयाबाबत माहिती प्राप्त केली. त्यानंतर नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला सदरचा गुन्हा हा सैदापुर परिसरातील अभिलेखावरील आरोपींनी केला असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. त्यानंतर शाहुपूरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी/अंमलदार यांनी गोपनिय माहितीचे व तांत्रिक विश्लेषणचे आधारे दि.30/03/2023 रोजी सैदापुर परिसरातील एकुण ०४ संशयीत इसम व ०१ वि.स. बालक असे एकुण ०५ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता त्यांनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच सदर आरोपी यांचेकडे तपास करीत असताना त्यांनी नमुद गुन्हा करणेससाठी अग्निशस्त्राचा वापर केल्याची व सदरचे हत्यावर हे आरोपींचे म्होरक्याकडे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे गुन्हे शाखेच्या अंमलदार यांनी संशयीत इसमांचे म्होरक्यास अधिक विश्वासात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्वक विचारपुस करुन त्याचेकडुन गुन्हा करणेससाठी वापरलेले अग्निशस्त्र हस्तगत केले. तसेच इतर आरोपी यांचेकडुन गुन्ह्यातील दरोडा टाकुन जबरदस्तीने घेवुन गेलेला ऐवज, मोबाईल हॅन्डसेट, गुन्हा करणेसाठी वापरलेले हत्यार व वाहने असा एकुण २ लाख८२ हजार७५० – रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तदनंतर नमुद आरोपी व वि. स. बालक यांना घेवुन आरोपींना नमुद गुन्हयाचे तपासकामी अटक करणेत आली आहे. संशयीत आरोपींना मा. न्यायालयाचे समक्ष हजर केले असता त्यांची दि. ३ एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अश्वीनी वाघमारे ह्या करीत आहेत.नमुद संशयीत इसम यांनी सराफी व्यवसायीकास दरोडा टाकुन त्याचेकडील बॅग व चाव्या घेवून गेले असले तरी त्यांचा मुळ उद्देश हा सराफी व्यवसायीकाचे अपहरण करुन त्यास पिस्तुलाचा धाक दाखवून त्याचेकडुन खंडणी वसुल करण्याचा होता, असे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापु बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्वीनी वाघमारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लैलेश फडतरे, सचिन माने, धंनजय कुंभार, पोलीस नाईक अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पवार, स्वप्निल पवार, पो.हवा./ संतोष इष्टे, दत्तात्रय पाटोळे, मिथुन मोरे, धनाजी घाडगे, प्रविण वायदंडे यांनी केली आहे. तसेच सायबर पोलीस ठाणेचे अंमलदार यांनी तांत्रिक माहिती देवून कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे.