व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड, : प्रशासन व पोलिस यंत्रणा हाताशी धरुन लोकसभेच्या ऐन निवडणुकीच्या काळात विरोधकांना रोखून त्यांची राजकिय कोंडी करण्याच्या उद्देशाने सत्ताधारी लोकप्रतिनिधीनी जुनी प्रकरणे उकरुन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरु केला आहे.आमच्याकडेही विरोधकांच्या गुन्ह्याची चोपडी आहे, आम्हाला ती चोपडी उघडायला लावु नका असा इशारा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस माण – खटाव नेते प्रभाकर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांचेवर म्हसवड पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल केला गेला.या संबंधी आज सकाळी श्री.देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा खरपुस भाषेत समाचार घेतला. श्री.किशोर सोनवणे यांचेवर वास्तविक हा गुन्हा दाखल करुन विरोधकांनी आपली दडपशाही दाखवुन दिली आहे, मात्र प्रशासनाने व पोलीसांनी राजकिय नेत्यांच्या सांगण्यावरुन गुन्हे दाखल करण्यापुर्वी व्यवस्थित माहिती घ्यायला पाहिजे होती जुनी प्रकरणे उकरुन गुन्हे दाखल करीत असाल तर आमच्याकडेही विरोधकांच्या गुन्ह्याची चोपडी आहे, आम्हाला ती चोपडी उघडायला लावु नका असा खरमरीत इशारा देत माण – खटाव राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी देत सोनवणे यांच्यावरील गुन्हा म्हणजे प्रशासन, पोलीस व राजकिय नेत्यांची मिलीभगत असल्याचा आरोप केला.
म्हसवड येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, दहिवडीचे नगरसेवक महेश जाधव, बाळासाहेब माने,चंद्रकांत केवटे,आनंद मासाळ, मोतिलाल खंदारे,धनाजी शिंदे,पप्पू शिंदे,सचिन लोखंडे,भिमराव लोखंडे, आकाश माने,रामचंद्र सोनवणे,धनराज सोनवणे, किरण शिंदे भैय्या जगताप आदी प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना श्री. देशमुख म्हणाले की २०१७ साली म्हसवड पालिकेमध्ये झालेल्या स्विकृत नगरसेवकांच्या निवडीवेळी तत्कालीन सत्ताधारी गटाकडुन श्री.सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अपत्त्याचे खोटे प्रमाणपत्र जोडल्याचा त्यांच्यावर त्यावेळी आरोप करण्यात आला होता, त्या तक्रारीवरुनच तत्कालीन निवडणुक निर्णय अधिकार्यांनी सोनवणे यांचा तो अर्ज रद्दबादल ठरवला होता.
त्यानंतर श्री.सोनवणे यांच्यावर विरोधकांनी कोणताही आरोप अथवा त्यांच्याबद्दलची आजवर तक्रार केलेली नाही असे असताना आता श्री.सोनवणे यांची सध्या राजकिय ताकत वाढु लागल्यानेच त्यांना रोखण्यासाठी २०१७ सालचे प्रकरण विरोधकांनी उकरुन काढत प्रशासनाला व पोलीसांना हाताशी धरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक एखाद्या प्रकरणात जर चुक झाली असेल तर त्याच्या विरोधात किमान दोन वर्षात तक्रार पोलीसांत दाखल केली जावु शकते एवढा कायदा आम्हालाही कळतो, मात्र २०१७ ते आज २०२४ म्हणजे जवळपास ७ वर्षांनी श्री.सोनवणे यांच्यावर गुन्हा कसा काय दाखल होवु शकतो,
प्रशासनानेही हा गुन्हा दाखल करताना कायदा काय सांगतो हे तपासले नाही का ? पोलीसांनीही केवळ राजकिय दबावापोटी हा गुन्हा दाखल केला आहे काय ? या सर्वांची उत्तरे प्रशासनाला व पोलीसांनाही द्यावी लागतील. तर विरोधकांच्या गुन्ह्यांचीही चोपडी आपणाकडे आहे, सोनवणे यांनी फक्त अर्ज दाखल केला होता, विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी तर खोटे प्रमाणपत्र जोडुन विकास सेवा सोसायटीसह नगसेवकाचा पदभार स्विकारत सत्ता उपभोगली आहे, आमच्याकडे त्याची सर्व माहिती आहे. मात्र आम्ही विरोधकांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला नाही तेव्हा विरोधकांनी एक लक्षात घ्यावे जेव्हा आपण दुसऱ्यावर आरोप करतो, त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो तेव्हा आपल्याही कार्यकर्त्यांचा त्यामध्ये बळी जावु शकतो पोलीसांनी व प्रशासनानेही कोणी राजकिय नेत्याच्या सांगण्यावरुन एखाद्यावर गुन्हा दाखल करु नये प्रकरणाची सत्यता तपासावी यासाठी आम्ही कार्यकर्त्यासमवेत म्हसवड पोलिस ठाण्यास भेट देऊन सहायक पोलिस निरीक्षक बिराजदार यांना भेटलो असुन या गुन्ह्याविषयी चर्चा केली आहे. असे ही शेवटी देशमुख यांनी सांगितले.