सांघिक खेळांमुळे संघभावना व जबाबदारीची जाणीव निर्माण होते : नितीन दोशी
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
येथील खंडोबा गणेश मित्र मंडळातर्फे चांदणी चौक जि.प.शाळेच्या भव्य मैदानावर इंजि.सुनील पोरे (साहेब )चषक भव्य प्लॅस्टीक बॉल नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले असून त्याच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष नितीन दोशी बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट ,डॉ वसंत मासाळ , नगरसेवक शंकरशेठ विरकर , विजय बनगर इंजि.सुनील पोरे हिंगणीचे सरपंच काकासाहेब माने बाळासाहेब पिसे बाबू मुल्ला शेखर विरकर वैभव विरकर संजय भागवत बी एम अब्दागीरे युवा नेते करण भैय्या पोरे ,अॅड.शुभम पोरे विजय चांडवले गणेश नामदास आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना नितीन दोशी पुढे म्हणाले सामाजिक कार्यात वाहून घेतलेल्या पोरे कुटुंबानी आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी तसेच म्हसवड नगरीच्या सेवेसाठी वाहून घेतले असून त्यांनीआमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे करुन जनमानसात आपला ठसा उमटवला आहे तरुणांनी आपला वेळ विधायक कामासाठी घालवावा या हेतूने त्यांनी या सामन्याचे आयोजन केले असूनअशा सांघिक खेळांमुळे संघभावना व जबाबदारीची जाणीव निर्माण होते

यावेळी बोलताना सुनील पोरे म्हणाले खेळ हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे खेळाला वाव दिला पाहिजे इतर गोष्टी कडे लक्ष देण्यापेक्षा खेळाकडे जास्त कल असला पाहिजे खेळामुळे शरीर निरोगी आणी सद्रुढ राहते आणी यातूनच देशपातळीवर नावलौकीक मिळवता येतो आम. जयाभाऊचा नेहमी एकच ध्यास असतो माझ्या तालुक्याचा विकास तालुक्यातील रस्त्यांचा विकास त्याचबरोबर खेळाडूंचा विकास झाला पाहिजे ही भावना घेऊन ते काम करत आहेत तरुणांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी दर वर्षीअशा प्रकारच्या सामन्यांचे आयोजन करण्याचा मानस असल्याचेही इंजि.सुनील पोरे यांनी सांगीतले नगरसेवक शंकर विरकर यांनी आपल्या भाषणात सुनील पोरे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत आम.जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यासाठी केलेले आदोंलन रक्तदान शिबीर ,वारकऱ्यांसाठी केलेली अॅम्बुलंसची सोय ,संत नामदेव महाराज जयंती उत्सव, पुराचे वाहून जाणाऱ्या पाण्यासाठी केलेले आंदोलन इ कार्याचा उल्लेख करत आज उदात्त हेतूने तरुणांसाठी भरवलेल्या या क्रिकेट सामन्यांचे कौतुक केले यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी इंजि सुनील पोरे (साहेब ) चषक स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल पोरे कुटुंबीयाचे कौतुक करुन आम. जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आक्टोंबर महिण्यात अशाच प्रकारच्या भव्य टेनिस बॉल स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या असल्याचे सांगीतले त्यामध्ये प्रथम पारितोषिक २ लाख ५० हजाराचे आहे या सर्व खेळाडूनी आपला सराव कायम ठेवून त्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले आभार करणभैय्या पोरे यांनी मानले