महाराष्ट्र राज्याच्या घडामोडीत गेली १८ महिने चाललेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या राजकीय वाक् – युध्दात खरी शिवसेना कोणाची आणि आमदार अपात्र ठरविणे बाबत अंतिम निकाल काळ दिनांक १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे.ॲड.राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आसून दोन्ही गटाचे आमदार हि पात्र असल्याचा निकाल दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शिवसेनेच्या गटात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.ॲड.नार्वेकर यांनी मुळ शिवसेना असलेल्या उद्धव ठाकरे गटा विरोधात निकाल दिल्याने म्हसळा तालुका शिवसेनेने प्रचंड नाराजी व्यक्त करून अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा जाहीर निषेध केला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध केल्याचे आणि केलेला निषेध पत्र त्यांच्या पर्यंत पोहच करण्यासाठी म्हसळा तालुका शिवसेना तालुका प्रमुख सुरेश कुडेकर यांनी म्हसळा तहसिलदार समीर घारे,म्हसळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीपान सोनवणे यांच्याकडे सुपुर्द केला आहे.या वेळी त्यांचे समावेत शिवसेना अधिकारी कौस्तूभ करडे,दिपल शिर्के,कृष्णा म्हात्रे,राजाराम तीलटकर,सुजित येलवे,अमजद साने,मंगेश पयेर,अतिफ उकये,पवन मर्चांडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.