महाशिवरात्री निमित्त म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराच्या भुयारातील स्वयंभू शिवलिंग महाशिवरात्रीला रात्रभर खुले राहणार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड ( दिलीपराज कीर्तने)

येथिल सिद्धनाथ मंदिरातील भुयारात असलेले स्वयंभू शिवलिंग दर वर्षी महाशिवरात्री निमित्त भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते. आता शुक्रवार दि.8 रोजी महाशिवरात्री निमित्त हे भुयार खुले केले जाणार आहे अशी माहिती सिध्दनाथ देवस्थान चे चेअरमन गणेश गुरव ,व्हा .चेअरमन वैभव गुरव ,सचिव दिलीप कीर्तने ( गुरव )यांनी दिली .
त्यानिमित्त शिवलिंगाची महती अशी________

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आदी भागातील लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथ मंदिरातील भुयारात स्वयंभू शिवलिंग आहे .श्रीधरस्वामींच्या काशिखंड ग्रंथामध्ये कालभैरवाच्या उत्पत्ती विषयी देण्यात आलेल्या माहीतीनुसार शिव आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण असा वाद निर्माण झाला त्यावेळी गायत्री म्हणाली, शिवस्वरुप ब्रह्म अग्रगण्य आहे. सर्वकाही शिवाच्या अधिन असते त्यामुळे सर्वश्रेष्ठ शिवच आहे हे ऐकून, ब्रह्मा आणि विष्णू यांना राग आला आणि त्यांनी गायत्री आणि शिवाचा निषेध केला. हे ऐकून शिवाचा क्रोध अनावर झाला. त्यांनी आपला उजवा हात क्रोधाने झटकला असता भूजदंडातून महांकाळ म्हणजेच काळभैरवाची उत्पत्ती झाली .त्याचवेळी शिवाच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती सर्वांना आली. शिवशंकर लिंगरुपाने म्हसवड येथील भूयारात स्थित झाले,


त्यामुळे म्हसवडचे श्री सिद्धनाथांचे स्थान ,मुळ काशी विश्वेश्वर काळभैरव शंकराचे मानले जाते. विश्वेश्वराचे रंक्षणकर्ते म्हणून काशितही काळभैरवांचा मान प्रथम आहे.
शिवाचे रक्षणकर्ते व शिवअवतार म्हणून काळभैरव म्हणजेच सिद्धनाथ व पत्नि जोगेश्वरी .येथील मंदिराच्या गाभा-यात भुयारात असणा-या सिंहासनावर आरुढ झाले, अशी आख्यायिका आहे.
        भुयार हे फक्त महाशिवरात्रीच्या रात्री भाविकांना खुले केले जाते वर्षभर हे भुयार बंद असते मंदिराच्या गाभा-यात डाव्या बाजूला भुयाराचे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावर ठेवलेल्या छोटेखानी पलंगावर श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या पंचधातूच्या उत्सव मूर्ती ठेवलेल्या असतात. भुयारातील शिवलिंगावर बांधण्यात आलेल्या सिंहासनावर श्री सिद्धनाथाच्या मूर्तीबाबतही एक गोष्ट आश्चर्यकारक आहे मंदिरातील सिंहासनावर असलेल्या श्रीसिद्धनाथ व माता जोगेश्वरी च्या मूर्तींना रोज सकाळी पंचामृत व गरम पाण्याने अभ्यंगस्नान घातले जाते त्यावेळी भुयारातील स्वयंभू शिवलिंगावर थेबं थेंब पाणी पडत असते. वर्षभर बंद असलेल्या भुयारातील शिवलिंगाला रोज जलाभिषेक होतो हा पौराणिक वास्तू शिल्पाचा खास नमुना आहे..

     महाशिवरात्रीला भुयारातील शिवलिंगास पारंपारिक पद्धतीने जलाभिषेक व पंचामृताचा अभिषेक करुन दहिभाताची पूजा बांधली जाते त्यानंतर हे शिवलिंग भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते.
या भूयाराची उंची १२फूट असून भूयारात उतरण्यासाठी पाय-या आहेत एकाच व्यक्तिला जाता येइल इतकी अरुंद वाट असल्याने केवळ ८ ते१० भाविकानांच दर्शनासाठी. सोडले जाते त्यांना वर घेतल्यानंतर दुसऱ्यांना सोडले जाते. भाविकांना भुयारात सोडणे व वर घेणे हा प्रकार आजपर्यंत चालू होता. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होऊन विल़ब लागत होता.मात्र आता तमाम भाविकांचच्या सुलभ दर्शनाच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टकडून भुयारात उतरण्यासाठी पायऱ्या करण्यात आल्या असून यामुळे तमाम. भाविकांची चांगली सोय होणार असल्याचे देवस्थान ट्रस्टकडून सांगण्यात आले.
या काळात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने एका छोट्या यात्रेचेच स्वरुप येते. रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत भाविक दर्शन घेत असतात यावेळी पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात येतो.
भुयाऱ्यातील स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनानेच येथील महाशिवरात्रीची सांगता होते.
दहा वर्षांच्या आतील मुले,ज्यांना बी.पी.,शुगर,हृदयविकार,अपंगत्व,आहे, शिवाय,दमा असणारे वयोवृद्ध महिला-पुरष,तसेच गरोदर महिला आदी भाविकांनी दर्शनासाठी भुयारात न जाता ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आहे.

शिवाय येथील पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.बिराजदार यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला असून रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत भाविकांनी दर्शन रांगेतून नच शिस्तीने दर्शन घेऊन भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
============
===============


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!