सातारा येथे श्री संतश्रेष्ठ नामदेव शिंपी समाज राज्यस्तरीय “स्वयंवर” वधु-वर  पालक परिचय मेळावा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड

                            श्री संतश्रेष्ठ नामदेव शिंपी समाज राज्यस्तरीय “स्वयंवर” वधु-वर  पालक परिचय मेळावा रविवार दिनांक४ फेब्रुवारी २०२४ रोजी राधिका संकुल मंगल कार्यालय सातारा येथे समस्त नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्था सातारा यांच्या वतीने आयोजीत करण्यात आल्याची माहिती  इंजि.सुनील पोरे यांनी     दिली.

               सातारा  येथे रविवार दिनांक ४ फेबुवारी 2024 रोजी सकाळी १०. ते साय ५ या वेळेत राज्यस्तरीय “स्वयंवर” वधु-वर  पालक परिचय मेळावा आयोजीत करण्यात आला असुन या मेळाव्यासाठी *संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास, जिल्हाध्यक्ष सुनिल पोरे, कार्यक्रम अध्यक्ष चंद्रकांत शेळके*, उपाध्यक्ष सुनिल हेंद्रे, मिना हरिष बारटक्के आदी प्रमुख पाहुणे येणार असुन प्रसन्न बगाडे, राजन पोरे, बाळासाहेब आंबेकर, सुरेश भस्मे, उमेश बारटक्के, मंदार उनकुले, विलास बारटक्के, रविकुमार आंबेकर, सुहास हेंद्रे, तुषार अवसरे, अविनाश बाचल, राजेश मिरजकर अदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 

              राज्यस्तरीय “स्वयंवर” वधु-वर  पालक परिचय मेळावासाठी समाजातील सर्व उपवर वघु-वर तसेच पालक यांनी उपस्थित राहवे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!