माण मध्ये शिवसेनेचा ” गाव तिथे शाखा”, उपक्रम जोरदारपणे राबवणार-:रणजितसिंह भोसले
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला
म्हसवड ( दिलीपराज कीर्तने )
शिवसेना( शिंदे गट ) वाढीसाठी प्रभागानुसार शाखा काढणे,एम.आय.डी.सी.मध्ये उध्योगमंत्र्यांच्या माध्यमातून माण- खटावच्या युवा सेनेस रोजगार मिळवून देण्यासाठी मुबलक संधी प्राप्त करून देणे,आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पार्श्वभूमि डोळ्यासमोर ठेऊन नगरपरिषदेसाठी योग्य उपाय योजना आखणे,पक्षाने सुरू केलेल्या शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानांतर्गत ऑनलाईन सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट पूर्ण करणार असून शिवसेनेचा – “गाव तिथे शाखा”, हा उपक्रम जोरदारपणे राबवणार असल्याचे प्रतिपादन,सातारा जिल्हा,युवा शिवसेना ( शिंदे गट ) अध्यक्ष,रणजितसिंह भोसले यांनी म्हसवड येथे केले.
शिवजयंतीचे औचित्य साधत पूर्वसंध्येला म्हसवड येथील विठ्ठल मंदिरात पक्षाची मिटींग भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली,त्यावेळी भोसले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
त्यांनी वरील मुद्द्यांचा सविस्तरपणे आढावा घेतला.
शिवसेना म्हसवड शहर प्रमुख,वैभव गुरव ( पप्पू नाना),माण तालुका अध्यक्ष , बाळासाहेब मुलाणी,माण तालुका युवा प्रमुख,हणमंत राजगे यांनी सदर बैठकीचे आयोजन केले.
यावेळी,सातारा जिल्हा विद्यार्थी सेना अध्यक्ष,संभाजी पाटील,जिल्हा उपप्रमुख,विजय जगदाळे,कोरेगाव,यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीस म्हसवड शहर आणि माण तालुक्यातील पदाधिकारी,संतोष लोखंडे,गोरख सराटे,जयेश गुंजाणे, स्वप्निल गुरव,खोट्या सुतार,तायाप्पा जाधव,अभिजित तरंगे,तुकाराम मासाळ,संतोष शिंदे,बाबा जाधव आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
वैभव गुरव यांनी आभार प्रदर्शन केले.या बैठकीच्या यशस्वितेसाठी वैभव गुरव,बाळासाहेब मुलाणी,हणमंत राजगे यांनी परिश्रम घेतले.
===============