सातारा जिल्ह्यातील शिंपी समाज बांधव घुमान पंजाब येथील नामदेवांचे कार्य व दर्शना साठी रवाना
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सातारा:प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील शिंपी समाज बांधवांचा घुमान, पंजाब येथील संत नामदेव महाराजांच्या कार्याचे दर्शन घेण्याचा उपक्रम नुकताच यशस्वीपणे पार पडला. नामदेव समाजोन्नती परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिंपी समाजाने संघटन कौशल्याच्या जोरावर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.
इंजि. सुनील पोरे यांनी जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जिल्ह्यात समाजोपयोगी उपक्रम, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, वधू-वर मेळावे, युवकांना स्वसमर्थ्यावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन आदी उपक्रम राबविले आहेत. समाज बांधवांची पंजाबातील संत नामदेव महाराजांचे कार्य एकदा तरी पाहावे ही प्रबळ इच्छा ओळखून पोरे यांनी अत्यल्प किमतीत यात्रेचे आयोजन केले.


