इस्रो भेटीसाठी क्रांतिवीर शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड …प्रतिनिधी.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था बंगळूरू च्या शैक्षणिक सहलीसाठी क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेत शिकत असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची राज्य शासनातर्फे निवड झाली आहे.

           शासनाच्या    प्रतिभावंत व गुणवंत विद्यार्थी उपक्रमांतर्गत अनुज विजय बनसोडे व सुज्ञम ज्ञानेश्वर हेगडे यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था बंगळूरू येथील पाच दिवसाच्या मोफत शैक्षणिक अभ्यास सहलीसाठी निवड झाली आहे. सदर दोन विद्यार्थी क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे  अनुक्रमे इयत्ता सहावी व सातवी मध्ये शिकत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश मिळवून निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद अंतर्गत या दोन विद्यार्थ्यांची प्रतिभावंत व गुणवंत विद्यार्थी म्हणून इस्रो बंगलुरू साठी त्याची निवड झाली आहे. संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांचे हस्ते अनुज बनसोडे व सुज्ञम हेगडे यांचा नुकताच शाळेत सन्मान करण्यात आला . शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!