साई मेडिकल फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष शैलेश दादा मोहिते यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
व्हिजन २४तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
उंब्रज प्रतिनिधी
साई मेडिकल फौंडेशन & चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष.. शैलेशदादा मोहिते यांचा वाढदिवस दिनांक 7 मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला
उंब्रज येथील साई मेडिकल फौंडेशन &चॅरिटेबल ट्रस्ट ने नेहमीच सामाजिक कार्याचा वसा घेतलेला आहे संस्थापक अध्यक्ष शैलेशदादा मोहिते हे नेहमीच समाजाचे काही देणं लागतो या उदात्त हेतूने सामाजिक कार्यात सक्रिय असतात,आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले,
दहावी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनां शुभेच्छा देऊन याची सुरुवात करण्यात आली,त्यानंतर शिवाजीनगर (उंब्रज) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनां शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले


