देवाचिया द्वारी प्लास्टिक-थर्माकोल निर्मूलनाचा रोटरी क्लबचा उपक्रम; मायणी येथे पर्यावरणपूरक पत्रावळ्यांद्वारे वारकऱ्यांना भोजन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक:अहमद मुल्ला
कुलदीपमोहिते
उंब्रज कराड/प्रतिनिधी
आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरातून पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्या विविध गावांतून मार्गस्थ होत आहेत. हजारो वारकरी त्यांच्या भक्तिभावाने विठ्ठल चरणी वाटचाल करत असताना, त्यांच्यासाठी वाटेत भोजन, पाण्याची व विश्रांतीची उत्तम व्यवस्था केली जाते. मात्र या सेवेमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक व थर्माकोलपासून बनवलेल्या द्रोण-पत्रावळ्यांमुळे निसर्गावर आणि मुक्या प्राण्यांवर गंभीर दुष्परिणाम होत आहेत.

वारकऱ्यांनी वापरलेली अन्नाने भरलेली प्लास्टिक किंवा थर्माकोलची पत्रावळे रस्त्याच्या कडेला फेकल्या जातात. त्यातील उरलेले अन्न खाण्यासाठी मुक्या प्राण्यांवर या पत्रावळ्या/द्रोणांसह अन्न खाल्ले जाते. परिणामी, त्यांची पचनक्रिया बिघडते आणि त्यांना जीवघेणे रोग होतात. यामुळे पर्यावरण हानीसह मुक्या जीवांचाही बळी जात आहे.

याला प्रतिबंध करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ उंब्रज यांच्या वतीने मायणी येथे एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या ठिकाणी पर्यावरणपूरक द्रोण व पत्रावळ्यांचा वापर करून वारकऱ्यांना भोजन देण्यात आले. “देवाचिया द्वारी, प्लास्टिक व थर्माकोल निर्मूलन घरोघरी” या संकल्पनेवर आधारित हा सामाजिक व पर्यावरणीय जाणीव असलेला प्रकल्प विशेष उल्लेखनीय ठरला.

या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ उंब्रज चे अध्यक्ष रो. विश्वनाथ केंजळे, सचिव रो. प्रकाश मसुगडे, तसेच सदस्य रो. किशोर कुंभार, रो. कमलाकर पाटील, रो. विनायक जाधव, रो. प्रमोद शहा, रो. विनोद पटेल यांची विशेष उपस्थिती होती.

वारकऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून, भविष्यात अधिकाधिक सेवा ठिकाणी पर्यावरणपूरक द्रोण व पत्रावळ्यांचा वापर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पर्यावरण रक्षणासोबतच मुक्या प्राण्यांचे जीवन वाचविण्याचा रोटरी क्लबचा हा उपक्रम समाजापुढे एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून नक्कीच पुढे येईल.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!