म्हसवडमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अश्वारूढ स्मारक भूमिपूजन सोहळा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड / प्रतिनिधी

म्हसवड नगरीत इतिहास घडवणारा एक भव्य सोहळा येत्या शनिवार, दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय नामदार जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या शुभहस्ते नगरपालिकेजवळ उभारण्यात येणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे.

या संदर्भात समाजबांधवांची म्हसवड येथे विशेष बैठक झाली. या बैठकीत कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी यांचे स्मारक म्हसवडच्या वैभवात भर घालणार असून, त्याच दिवशी समाजातील गुणवंत व्यक्तींचा गौरव समारंभ देखील घेण्यात येणार आहे.

✨ कार्यक्रमाचे वेळापत्रक :

दुपारी 2.00 वाजता – धनगरी वेशभूषेत गजी-ढोलांचा पारंपरिक स्वागत सोहळा

सायं. 5.00 वाजता – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन

या ऐतिहासिक क्षणासाठी म्हसवड शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या नियोजन बैठकीला माण-खटाव लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, नगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ, युवा नेते लुणेश वीरकर, सामाजिक कार्यकर्ते विजय बनगर, माजी नगरसेवक आप्पासाहेब वीरकर, अस्थिरोग तज्ञ डॉ. बाबासाहेब दोलताडे, युवा कार्यकर्ते विशाल विरकर, लक्ष्मण विरकर (करले), कृष्णदेव मदने, पोपट मासाळ, डॉ. प्रमोद गावडे, दादासाहेब दोरगे, नारायण मासाळ, रामभाऊ कोडलकर, म्हसवड मंडळ अध्यक्ष प्रशांत गोरड, नानासाहेब दोलताडे, सचिन विरकर यांसह असंख्य समाज बांधव उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

म्हसवड नगरीत उभारले जाणारे हे स्मारक आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *