“गाडेकरवाडी नवतरुण गणेश मंडळाचा आदर्श इतर मंडळांनी घ्यावा”: सपोनी अक्षय सोनवणे
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड :प्रतिनिधी
“वयोवृद्ध व निराधारांचा सन्मान करणे ही खरी समाजसेवा आहे. गाडेकरवाडी नवतरुण गणेश मंडळाने हा उपक्रम राबवून समाजासमोर आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. इतर मंडळांनीही या उपक्रमातून प्रेरणा घ्यावी,” असे गौरवोद्गार म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनी अक्षय सोनवणे यांनी काढले.
गाडेकरवाडी येथील नवतरुण गणेश मंडळाने गणेशोत्सव काळात वयोवृद्ध व निराधार व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी पंचायत समिती सदस्य गोरख शिर्के, पोलीस पाटील संघटनेच्या सातारा जिल्हा अध्यक्षा सौ. हर्षदा ताई अजितराव शिर्के, मंडळाचे अध्यक्ष अक्षय बिडगर, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, धनाजी गाडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सपोनी सोनवणे पुढे म्हणाले, “वयोवृद्धांचा अनुभव आणि मार्गदर्शन ही समाजासाठी अमूल्य ठेवा आहेत. त्यांना सन्मान देणे म्हणजे गणेशभक्तीतून समाजाप्रती जबाबदारी पार पाडणे होय.”
यावेळी गणेशोत्सव काळात मंडळाने राबवलेल्या सामाजिक उपक्रमांचेही कौतुक करण्यात आले. भक्तांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अक्षय बिडगर यांनी केले तर आभारप्रदर्शन उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी रामभाऊ मस्के, अंकुश बिडगर, सुरेश बोडरे, नवनाथ मासाळ, विकास मासाळ, प्रकाश चव्हाण, सोमनाथ चव्हाण, पंकज बिडगर, सुजल चव्हाण, अमर चव्हाण, फनटू चव्हाण, दीपक चव्हाण, समाधान गाडेकर, नितीन लोखंडे, उमेश चव्हाण, अक्षय बिडकर यांनी परिश्रम घेतले.
🔸 गाडेकरवाडी नवतरुण गणेश मंडळाचा हा उपक्रम गणेशोत्सवात सामाजिकतेची नवी दिशा दाखवणारा ठरला आहे.

