सौ. योगेश्वरी स्वामी यांच्या सेवापूर्ती निमित्त अभिष्टचिंतन सोहळा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड, ता. माण (जि. सातारा)
उपशिक्षिका सौ. योगेश्वरी अनिलकुमार स्वामी (जि. प. प्रा. शाळा म्हसवड नं. १) यांच्या सेवानिवृत्ती निमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता यशोदा मंगल कार्यालय, म्हसवड येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. लक्ष्मण पिसे साहेब (गटशिक्षणाधिकारी, पं. स. माण) उपस्थित राहणार आहेत. सेवानिवृत्त होणाऱ्या सौ. योगेश्वरी स्वामी यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते केला जाणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. संगीता जाधव मॅडम (शिक्षण विस्तार अधिकारी, ता. खटाव), मा. श्री. जगन्नाथ विरकर साहेब (माजी केंद्रप्रमुख, म्हसवड नं. ३), मा. सौ. शमीमबानू तांबोळी मॅडम (शिक्षण विस्तार अधिकारी, बीट – मार्डी), तसेच मा. श्री. दिपकराव पतंगे साहेब (केंद्रप्रमुख, म्हसवड नं. ३) यांची उपस्थिती लाभणार आहे.
स्नेहभोजनाचे आयोजन दुपारी ११ ते ३ या वेळेत करण्यात आले आहे. हा कार्यक्रम समस्त स्वामी, वस्त्रद परिवार व आप्तेष्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून सर्व मान्यवर, शिक्षकवर्ग व नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

