क्रांतिवीर शैक्षणिक संकुल इमारतीचे उद्घाटन : प्रा. विश्वंभर बाबर
व्हिजन २४ तास (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड : (प्रतिनिधी )
कृषी विकास प्रतिष्ठान संचलित
क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम स्कूल म्हसवड या शाळेच्या इमारतीचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष कृषीरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी दिली.
शाळेच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ बुधवार दि. १९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण राहणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून , रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव, प्राचार्य. आर. डी. गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे वरिष्ठ सरचिटणीस देवानंद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, सातारा जिल्हा काँग्रेस प्रभारी श्रीरंग चव्हाण , माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, सातारा जिल्हा काँगेस कमिटी अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव रणजित देशमुख, प्रदेश प्रतिनिधी अॅड. विजयराव कणसे, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचेसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वभर बाबर यांनी केले आहे.