सामान्यातील असामान्य नेता नामदेव समाजोन्नती परिषदेने गमावला : इंजि सुनील पोरे
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक : अहमद मुल्ला )
म्हसवड
कै संजीव विष्णूपंत तुपसाखरे राज्याला शिंपी समाज राज्याध्यक्ष या नात्याने परिचित तथापि त्या पलिकडे एक नाशिक महापालिकेचा आदर्श नगरसेवक,काॅग्रेस पक्षाचा एक पाईक शिपाई या नात्याने देखील त्यांना समाज ओळखतो उमद्या वयात युवक काँग्रेसचे अध्यक्ष होण्याचा बहुमान पटकावला होता नामदेव शिंपी समाजोन्नती परिषदेचे भवितव्य म्हणून उभा महाराष्ट्रातील समाज त्यांच्याकडे पाहात होता शेवटच्या श्वासापर्यंत समाज हितासाठी झटलेल त्यांना आज आपण पाहतोय २४ तारखेला नाशिक येथे असलेल्या बैठकीच्या व्यवस्थेवर शेवटचा आढावा घेताना राज्यातून ठिकठिकानावरुन येणार्या समाज बांधवांशी स्वतः भ्रमणध्वनीवर संपर्क साधत होते त्याप्रमाणे मलाही २३ तारखेला रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान मी व माझे सहकारी कुठपर्यंत आलो आहोत या विषयांनी माझेशी झालेल बोलण आताही माझ्या कानांत घुमतय… नमस्कार साहेब कुठ पर्यंत आलात मी.. साहेब शनिवार असलेने शनैश्वर दर्शन घेऊन रात्री उशिरापर्यंत नाशिकला पोहोचतोय मग जेवायला इकडेच या मी नाही साहेब उशीर होईल वाटेत जेवतो अच्छा इथे लाॅन वर तुमच्यासाठी रुम तयार ठेवल्यात व एक मदतनीस ठेवलाय सकाळी भेटू…हे बोलत असताना त्यांना वेदना होत असाव्यात हे मला नियतीनं का कळवल नाही ही सल मनात घर करुन राहीली
सकाळी मिटींग ठरले वेळे पर्यंत देखील अध्यक्ष न आल्याने विचारणा केली असता अचानक तब्येत बिघडली आहे त्यामुळे ते येत नाहीत असे कळले मला वाटलं नासप अंतर्गत होत असलेल्या आरोप प्रत्यारोपाचा निषेध म्हणून येत नसावेत ठरले प्रमाणे मुख्य विश्वस्त यांचे अध्यक्षतेखाली मिटींग संपन्न झाली तेवढ्यात प्रमुख मंडळी पैकी दोघांनी मला खुणावत बाहेर बोलाऊन आपल्या अध्यक्षांना पहाटे ह्रदय विकारांचा त्रास झालेला आहे ऑजींयो प्लास्टी झाली आहे व ते आय सी यु मध्ये आहेत त्यांना भेटायला निघायचय तडक हाॅसपीटल कडे आलो मोठ्या मुश्किलीने आयसीयुत त्यांना पाहता आले, तुपसाखरे वहिनी व मुलाची भेट घेतली आधार देऊन निरोप घेतला नियतीने पुढ काय वाढून ठेवलंय हे माहीत नसलेने भरले अंतःकरणाने नाशिक सोडलं रात्री उशीरा म्हसवडला पोहचलो सकाळी साडे सहाला विश्वस्त श्री अशोक कालेकर यांनी फोनवर ही आभाळ कोसळलेली बातमी… सुनील आपले संजु शेठ गेले ही बातमी ऐकून माझ्यासारख्या धाडसी माणसाला आपण कोसळल्याची भावना झाली काही क्षण निशब्द झालो व काव्य पंक्ती आठवली… कोण दिवस येईल कैसा| नाही देहाचा भरोसा||…आता त्यांचं अपुर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने झटणे हिच खरी श्रद्धांजली…
इंजि सुनील पोरे जिल्हाध्यक्ष नासप सातारा

चौकट:- मध्यंतरी चर्चेच्या वेळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील कामाबद्दल कौतुक करुन अशा पध्दतीने महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आपल्या समाजाचे अध्यक्षांनी करायला पाहिजे हि खंत बोलून दाखवली होती व ही २४ ची मिटींग झाली की राज्यभर दौरे करु त्यावेळी तुम्ही वेळ द्यावा ही अपेक्षा व्यक्त केली होती त्याप्रमाणे कोकण दौरा करणेचा मानस होता त्याप्रमाणे चिपळूणचे अध्यक्ष विवेक रेळेकर यांचेशी आपसात संपर्क देखील झाला होता…