कु. अक्षता अब्दागिरे हिची जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये कु. अक्षता अंकुश अब्दागिरे हिची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाली हे खूप मोठं यश असलं तरी आपण या पदाचा वापर समाज कल्याणासाठी किती तळमळीने करतो यावरच सक्सेस अवलंबून असते असे उद्गार म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि राजकुमार भुजबळ यांनी काढले
म्हसवड येथील अब्दागिरी कॉम्प्लेक्स च्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये अक्षता अंकुश अब्दागिरी हिची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सपोनि भुजबळ होते. यावेळी म्हसवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सर्जेराव माने सिद्धनाथ हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रवीण दासरे ज्ञानवर्धिनी हायस्कूलचे प्राचार्य गोपाळ मासाळ, युवराज बनगर, बाळासाहेब कलढोणे, पोपटराव बनसोडे पाटील, विजय भागवत, माजी
नगरसेवक बी एम अबदागिरे, विक्रम लोखंडे, महावीर पिसे, योगेश जंगम, आदि मान्यवर उपस्थित होते
या पुढे बोलताना भुजबळ म्हणाले आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे जे पालक आपल्या मुलींना शिक्षणाची संधी देतात त्या मुली त्या संधीच सोनं केल्याशिवाय राहत नाहीत याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कु अक्षता अब्दागिरे ही आहे. तिचे वडील अंकुश अब्दागिरी यांनी त्यांच्या मुला मुलींना संधी दिल्यामुळे आज त्यांची तिन्ही मुले चमकत आहेत. त्याचबरोबर मुलांच्या यशामध्ये शिक्षकांचाही वाटा तेवढाच मोलाचा असतो आज अक्षता अब्दागिरी हिने जे यश मिळवले आहे ते कौतुकास्पद असून तिने यावरच न थांबता अजूनही मोठी अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगून ते पूर्ण करावे व आपल्या अधिकाराचा वापर जनकल्याणासाठी करावा त्यावरच आपल सक्सेस अवलंबून असतं असे उद्गार भुजबळ यांनी काढले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना अक्षता अब्दागिरे म्हणाल्या आज माझ्या या यशामध्ये माझे आई-वडील आणि गुरुजन वर्ग यांचा मोलाचा वाटा आहे माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून परिचित आहे. पाणी व प्रश्न ही एक तालुक्याला लागलेली मोठी समस्या भेडसावत असते त्या प्रश्नाची मला पूर्ण जाण असल्याने मला माझ्या जलसंपदा विभागात काम करताना
निश्चित मदत होणार आहे मी माझ्या विभागात काम करत असताना ज्या भागांमध्ये मला संधी मिळेल त्या भागातील जनकल्याणासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार असून माण तालुक्यातील मुला मुलींनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन अधिकारी बनावे असे आव्हान अक्षता अबदागिरे यांनी करून आज माझा अब्दागिरे कॉम्प्लेक्स हे आमचे एक कुटुंब असून या कुटुंबीयांच्या वतीने आज माझा वाढदिवस साजरा करून माझा सत्कार केला व यावेळी माझे गुरुजन वर्ग उपस्थित होते हा आनंद द्विगुणित
झाला आहे. यावेळी सिद्धनाथ हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रवीण दासरे ज्ञानवर्धिनी हायस्कूलचे प्राचार्य गोपाळ मासाळ माजी सरपंच युवराज बनगर आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश अब्दागिरे यांनी केले तर सूत्रसंचालन आप्पासाहेब गायकवाड पाटील यांनी केले तर आभार बीएम अबदागिरे यांनी मानले.