मौनी दिगंबर भगवान महाराज मठ संजीवन समाधी उंब्रज येथे पुण्यतिथी सोहळा मोठ्या उस्थांहात संपन्न.

बातमी Share करा:

 

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते

उंब्रज दि २२ :प्रतिनिधी

         मौनी दिगंबर भगवान महाराज मठ संजीवन समाधी उंब्रज येथे पुण्यतिथी सोहळा सालाबाद प्रमाणे मोठ्या उस्थांहात संपन्न झाला .उंब्रज तालुका कराड येथे मौनी दिगंबर भगवान महाराज यांनी सन १९१८ साली आजच्या दिवशी संजीवन समाधी घेतली.त्यांनी घेतलेल्या संजीवन समाधीला आज १०५ वर्ष झाली आहेत.दरवर्षी हा दिवस पुण्यतिथी सोहळा म्हणून उंब्रज मधील नागरिक मोठ्या भावपूर्ण वातावरणात हा सोहळा साजरा करतात.दरसाल प्रमाणे भाविक आजही या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   आज पासून समाधी मठात आज भजनाचे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन या सोहळ्यात केले होते , .तसेच आयोजित महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उंब्रज आणि परिसरातून हजारो भाविक उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!