धनगर समाजाच्या आरक्षण मागणी साठी गुरुवार दि १ रोजी माण तालुका बंद

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज  (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड

         म्हसवड नगरपालिकेसमोर धनगर समाजाच्या आरक्षणसाठी चालू असलेल्या आमरण उपोषणाची गत ५ दिवसापासून कोणीही दखल घेत नसल्यामुळे सकल धनगर समाजा तर्फे गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी माण तालुका बंदची हाक देण्यात आली आहे

         महाराष्ट्रात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला  राज्य घटनेने आदीवासी (एस.टी.) चे आरक्षण दिले आहे, मात्र शासन धनगर व धनगड या शब्दाचा भेद करून धनगर  समाजाची आजवर दिशाभुल करीत आले आहे,

             यापुढे शासनाने धनगर समाजाची दिशाभुल न करता या समाजाला घटनेप्रमाणे एस.टी. आरक्षण मिळण्या करीता ‘ धनगड ‘ची ‘धनगर’ अशी दुरुस्तीची शिफारस केंद्र सरकारकडे करावी या प्रमुख मागणी सह राज्यातील सर्व धनगर समाजाच्या न्याय व हक्काच्या मागणी साठी केलेल्या सर्व आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करुन एस. टी.चे सर्टिफिकेट वितरीत करावे या मागणी करीता धनगर समाजाच्या उत्तम विरकर, गणेश केसरकर, प्रकाश हुलवान या 3 युवकांनी म्हसवड नगर पालिकेसमोर दि.२७ पासुन आमरण उपोषण सुरू केले आहे.

         आज या आमरण उपोषणाला ५ दिवस झाले तरी अद्याप या उपोषणाची वरिष्ट पातळीवरुन कोणीही दखल घेत नसल्यामुळे सकल धनगर समाजातर्फे गुरुवार दि १ फेब्रुवारी रोजी संपूर्ण माण तालुका बंदची हाक देण्यात आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति. जिल्हाधिकारी, ,उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी ,तहसिलदार व म्हसवड पोलीस स्टेशनला देण्यात आल्या आहे 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!