म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई: १८० लिटर ताडी व देशी-विदेशी दारू जप्त; एका दिवसात ३ ठिकाणी धडक
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड (प्रतिनिधी):
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध दारू, ताडी विक्रीला आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी धडाकेबाज मोहीम राबवली असून अवघ्या एका दिवसात ३ ठिकाणी छापा टाकून तब्बल १८० लिटर ताडी तसेच देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई म्हसवड पोलिसांच्या ॲक्शन मोडचे उत्तम उदाहरण ठरत असून, अवैध धंद्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा दणका दिला आहे. या मोहीमेमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
1. दादासो किसन खुपकर, रा. पळसावडे, ता. माण, जि. सातारा
2. अशोक गुलाब बनसोडे, रा. इंजबाव, ता. माण, जि. सातारा
3. आनंदराव बाळू बनसोडे, रा. रांजणी, ता. माण, जि. सातारा
ही विशेष मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे.यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, सुभाष भोसले, रूपाली फडतरे, मैना हांगे, नीता पळे, सुरेश हांगे, नवनाथ शिरकुळे, युवराज खाडे, हर्षदा गडदे.यांनी पार पाडली.
पोलीस प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले की, अशीच ठोस व प्रभावी कारवाई येणाऱ्या काळातही सातत्याने राबवली जाणार आहे.