क्रांतिवीर शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश.
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड…प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड च्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
नुकताच इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड इयत्ता 5 वी स्कॉलरशिप मध्ये आयुध सोमनाथ धावड यांनी 300 पैकी 244 तर इयत्ता आठवी मध्ये अथर्व हरिभाऊ माने यांनी 300 पैकी 254 गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक होण्याचा बहुमान मिळविला. तसेच ईश्वरी त्रिगुणे 300 पैकी 234 , जागृती संजय माने 300 पैकी 226 , तसेच क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम स्कूल सीबीएसई म्हसवड मधील विद्यार्थी इयत्ता आठवी सिद्धेश महादेव चोपडे 300 पैकी 254 , सुज्ञम ज्ञानेश्वर हेगडे 300 पैकी 236 , अवंती गुलाब शेटे 300 पैकी 228 , या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी चांगले गुण मिळवून क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे नाव उज्वल केले. शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे , केंद्रप्रमुख दीपक कुमार पतंगे , कृषिरत्न विश्वंभर बाबर , मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, संस्था उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर , प्राचार्य विन्सेंट जॉन , शिक्षक तसेच पालक प्रतिनिधी यांनी अभिनंदन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.