श्री.समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, श्रीमती आँचल दलाल,अपर पोलीस अधीक्षक, सातारा* तसेच श्रीमती अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी, विभाग दहिवडी कॅम्प वडूज यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ अनुषंगाने राजकीय गुन्हे दाखल असले तसेच सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता अशा गुन्हेगारांवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करणेबाबत आदेश पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते.
त्याप्रमाणे म्हसवड पोलीस ठाणे हददीतील रेकॉर्डवरील 23 गुन्हेगार यांचे हातुन दखलपात्र/ अदखलपात्र स्वरुपाचा गंभीर अपराध होण्याची शक्यता असलेने, त्यांचेकडून सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होऊ नये या करीता त्यांना दि.०3/०५/२०२४ रोजीचे ००.०० वा. पासून दि. ०७/०५/२०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत या कालावधीमध्ये सी. आर. पी. सी. १४४ (२) प्रमाणे म्हसवड पोलीस ठाणेकार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करणेबाबत आदेश होणेकरीता प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी माण विभाग, माण यांना पाठवण्यात आले होते. त्यांप्रमाणे अभिलेखावरील गुन्हेगार यांना सीआरपीसी १४४ (२) प्रमाणे दि.०3/०५/२०२४ रोजीचे ००.०० वा. पासून दि ०७/०५/२०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत म्हसवड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात प्रवेश करणेस मनाई करण्यात आली आहे...