पत्रकार कल्याणासाठी ऐतिहासिक पाऊल — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विशेष सत्कार
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश तळेकर ( प्रतिनिधी )
मुंबई :
पत्रकार क्षेत्रासाठी ऐतिहासिक कार्य केलेल्या उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा “मीडिया एक्सेलन्स अवॉर्ड २०२५” कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. पत्रकार नोंदणीसह कल्याणकारी महामंडळ स्थापनेचे आश्वासन व त्याला मंत्रिमंडळाची मिळालेली मंजुरी ही त्यांच्या नेतृत्वात झालेली ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.
पत्रकार बहिणीच्या हक्कासाठी लढणाऱ्या “माई मीडिया २४” व “मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया”च्या (माई) अध्यक्ष शीतल हरीष करदेकर यांनी सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करून पत्रकार क्षेत्रातील त्यांचे योगदान अधोरेखित केले.
शीतल करदेकर यांनी पत्रकार कल्याण महामंडळासाठी आमरण उपोषण केले होते. त्यावर तात्काळ प्रतिसाद देत त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामंडळाच्या स्थापनेचे लिखित आश्वासन दिले व पुढे मंत्रीमंडळामार्फत मंजुरीही दिली. या ऐतिहासिक कार्याबद्दल त्यांना “पत्रकारांचा खरा भाऊ” म्हणून ओळख मिळाली.
मीडिया एक्सेलन्स अवॉर्ड २०२५ कार्यक्रमाचे आयोजन “प्लॅनेट मराठी”च्या सहकार्याने करण्यात आले. या कार्यक्रमात “थॅलसेमिया मुक्त महाराष्ट्र” हा सामाजिक विषय, भारूड आणि जोगव्यातून पत्रकार हिताचे सादरीकरण, तसेच संतोष पवार यांच्या कलावंत टीमकडून शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रवेश सादर करण्यात आले.
कार्यक्रमात पत्रकार, महिला, शेतकरी व समाजहितासाठी काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रातील गुणीजनांना देखील गौरविण्यात आले.
हा सत्कार आणि संपूर्ण उपक्रम माध्यमांच्या हक्कांसाठी एक सकारात्मक पाऊल ठरत असून पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.