ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात…
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी –
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती मोठ्या उत्साहाने जि. प. शाळा गोसावीवाडी ता. माण येथे साजरी करणेत आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त जिल्हा परिषद गोसावीवाडी प्राथमिक शाळेत बालसभा आयोजित करणेत आली होती. बालसभेचे अध्यक्ष इ. दूसरीतील विद्यार्थीनी कु. अनन्या बिराजदार हिने भूषविले.


