अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रम म्हसवड येथील आनंदीबाई जोशी सांस्कृतिक हॉलमध्ये संपन्न
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड:
केंद्र सरकारने आयोजित केलेल्या फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अथोरिटी ऑफ इंडिया या उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रम म्हसवड येथील आनंदीबाई जोशी सांस्कृतिक हॉलमध्ये नुकताच संपन्न झाला या प्रशिक्षणास म्हसवड शहरातील व्यापारी वर्ग उपस्थित होता
या प्रशिक्षणासाठी केंद्र सरकारने श्री अनालिटीकल टेस्टिंग अँड रिचार्ज या संस्थेला अधिकृतपणे नियुक्त केले आहे म्हणून संस्थेच्या प्रतिनिधी कु. सोनल पानमांड प्रशिक्षिका यांच्यामार्फत हे प्रशिक्षण घेण्यात आले होते
सदर प्रशिक्षण हे अन्नपदार्थ विक्रेते व उत्पादक व्यावसायिक तसेच वाहतूकदार यांना प्रशिक्षण घेणे हे शासनाने बंधनकारक तसेच अनिवार्य केले आहे यापुढे या प्रश्नाचे प्रमाणपत्र हे फूड लायसन्स काढताना किंवा नूतनीकरण करताना आवश्यक असणार आहे या प्रशिक्षणामुळे व्यवसायाचा दर्जा व गुणवत्ता वाढणार आहे तसेच लोकांच्या आरोग्यासाठी ही प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे अशी माहिती यावेळी कु. सोनल पानमांड यांनी दिली
या प्रशिक्षणासाठी म्डसवड शहरातील व्यापारी श्री रुपेश व्होरा प्रीतम शहा परेश व्होरा यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते या प्रशिक्षणासाठी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून कैलास पवार सचिन पाटील उपस्थित होते तसेच सातारा जिल्हा समन्वयक श्री अरविंद इंजे विष्णू आवळे जयदीप जाधव आणि प्रशांत भोसले हे उपस्थित होते या प्रशिक्षणासाठी म्ह सवड शहरातील अण्णा व खाद्यपदार्थ विक्रेते व उत्पादक व्यापारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते