सातारा पोलिस दलात खळबळ : औंध पोलीस ठाण्यात एक लाखाची लाच घेताना 2 पोलिस अधिकारी रंगेहाथ सापडले

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )

पोलीस टाइम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी श्री. सादिक शेख 

सातारा |

सातारा जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आलेली आहे. औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब जाधव यांना एक लाख रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत एका ४२ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. सदरची कारवाई आज जुना एस टी स्टँड, बाजार पटांगण, औंध (ता.खटाव) येथे करण्यात आली.

याबाबतची अधिक माहिती अशी,  तक्रारदार यांचे परमिट रुम मधुन दारुची अवैध वाहतूक केल्यामुळे औंध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना मदत करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तसेच तक्रारदार यांना त्यांच्या व्यवसायात इथुन पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी दत्तात्रय दराडे आणि बापुसाहेब जाधव यांनी दीड लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तंडजोडीनंतर 1 लाख रूपये लाच रक्कम स्विकारल्यावर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. औंध पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

पुणे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस उपअधीक्षक श्रीमती उज्वल अरुण वैद्य, पो.ना. निलेश चव्हाण, पो.शि.  तुषार भोसले, पो. शि निलेश येवले यांनी कारवाई केली.

 

आवाहन:

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.

श्रीमती उज्वल अरुण वैद्य,पोलीस उपअधीक्षक

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा

मोबाईल क्र. 9823231244

कार्यालय क्र. 02162-238139

ईमेल dyspacbsatara@gmail.com , dyspacbsatara@mahapolice.gov.in

टोल फ्री क्र. 1064

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!