म्हसवडजवळ पिकअपच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू, एक जखमी
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड, –प्रतिनिधी
माण तालुक्यातील पळशी गाव हद्दीत आज सकाळी भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा INTRA पांढऱ्या रंगाच्या विना नंबर प्लेटच्या पिकअपने सकाळी फिरायला चाललेल्या दोन महिलांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे.
फिर्यादी प्रकाश नाना खाडे (रा. पळशी, ता. माण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांची आजी बाळाबाई दत्तात्रय गंबरे (वय 68) व लताबाई हनुमंत खाडे (वय 60, रा. पळशी) या दोघी पिराची टेकडी येथील देवी मंदिराजवळील रस्त्याच्या कडेला चालत फिरत असताना हा अपघात झाला.
अज्ञात चालकाने पिकअप हयगईने, अविचाराने व निष्काळजीपणे चालवून दोघींना जोरदार धडक दिली. या धडकेत बाळाबाई गंबरे यांचा जागीच मृत्यू झाला तर लताबाई खाडे गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर आरोपी चालकाने जखमींना उपचार न देता घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, अज्ञात चालकाविरुद्ध BNS 106(1), 106(2), 281, 125(A), 125(B), तसेच मोटार व्हेईकल ॲक्ट कलम 184, 134(A), 134(B) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे हे करीत आहेत.

