डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त म्हसवड शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन |

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड दि. १३ 
        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त म्हसवड शहरात जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन, यानिमीत्त शहरात विविध कार्यक्रमाचे व थोर वक्त्यांच्या व्याखानांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या आयोजकांनी दिली आहे.
    म्हसवड शहरात दरवर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, यंदाही शहरात मोठ्या प्रमाणावर जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे, विशेष म्हणजे यंदा जयंती निमित्त ८ दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या ८ दिवसामध्ये फुले, शाहू, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या संयुक्त जयंती निमित्त शुक्रवार  दि. १४  एप्रिल २०२३ ते गुरुवार दिनांक २१ एप्रिल २०२३ या ८ दिवसात विविध  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा  प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या ४ फुटी उंचीच्या मुर्तीची भव्य मिरवणूक होणार आहे, तर जयंती निमित्त महाराष्ट्रातील आघाडीच्या व्याख्यात्या सुषमाताई अंधारे यांचे व्याख्यान होणार आहे. त्याच बरोबर सातारा जिल्ह्याचे तरुणांचे आयडॉल जिल्हा  पोलीस प्रमुख समिर शेख यांचे आजच्या तरुणांना मार्गदर्शन आणि रोहित देशमुख यांचे संविधानचे जागर या विषयावर सडेतोड माहिती युवकां पर्यंत जयंतीच्या माध्यमातून पोहचवली जाणार आहे.
 म्हसवड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, जयभीम युवक मंडळ व भिम टायगर ग्रुप यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  १४एप्रिल. रोजी सकाळी ९ वाजता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी ध्वज वंदना, डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांना व इतर महात्म्यांच्या फोटोनां पुष्पहार अर्पण सामुदायिक त्रिशरण पंचशील, मुलांची भाषणे, सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे यांच्या वतीने दुपारी १ ते ४ भोजनदान, सांयकाळी ६ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांची भव्यदिव्य मिरवणूक या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्ररथ या मिरवणुकीत म्हसवड सह म्हसवड परिसरातील आंबेडकर प्रेमी तरुण, बांधव, भगिनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी १५ एप्रिल रोजी सांयकाळी ७ वाजता भिम गीतांचा कार्यक्रम  भिम जल्लोष २०२३ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे  होणार आहे. रविवार दिनांक १६ रोजी एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दोन गटात वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये लहान गट १) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य २) मी वाचलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर ३) डॉ बाबासाहेब आंबेडकर व बालवयातील शिक्षण ,प्रथम बक्षीस ३०० दुसरे २०० तिसरे १०० रुपये
मोठा गट १) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा धगधगता इतिहास २) आजच्या तरुणांना विषयी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मत ३) भारतीय संविधान भारतीयासाठी शाप कि वरदान या विषयावर या स्पर्धा होणार आहेत, यामध्ये
प्रथम बक्षीस ५००, दुसरे ३०० तर तिसरे २०० रुपये सर्व बक्षीस पत्रकार एल के सरतापे यांच्या वतीने देण्यात येणार आहेत.
       सोमवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी १० ते सांयकाळी ४ या वेळेत मायणी मेडीकल काॅलेज येथील रक्त पेढी व सातारा रक्त पेढी यांचे रक्तदान शिबीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन म्हसवड येथे आयोजित केले आहे.
        मंगळवार १८ एप्रिल २०२३ रोजी महात्मा फुले चौकात सांयकाळी ७ वाजता” भारतीय संविधान” या विषयावर इतिहासकार प्राध्यापक  रोहित देशमुख यांचे  व्याख्यान होणार आहे
   गुरुवार दिनांक २० एप्रिल रोजी सायंकाळी  ५ वाजता आनंदीबाई मंगल कार्यालय मुख्य पेठ म्हसवड  येथे युवकांचे आयडॉल जिल्हा पोलीस प्रमुख समिर शेख यांचे शिक्षणा पासून दूर चाललेला आज तरुण, व त्यांच्या पुढे उभी असलेली आव्हाने या विषयावर व्याख्यान होणार आहे.
   तर  सुप्रिध्द वक्त्या असलेल्या सुषमा अंधारे यांचे फुले, शाहू, आंबेडकर, छ. शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, राजे उमाजी नाईक आदी महापुरुषांच्या इतिहासावर अभ्यासपूर्ण सडेतोड  व्याख्यान शुक्रवार दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी  सायंकाळी ७ वाजता  म्हसवड नगरपालिकेच्या समोर होणार आहे. सदर सर्व कार्यक्रमास म्हसवड व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, जयभीम युवक मंडळ, भिम टायगर ग्रुप म्हसवड यांनी केले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!