व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड माण तालुक्यातील बनगरवाडी गावात श्रीमंत रंगनाथ बनगर रा.बनरगरवाडी यांचे शेतातील विहरीमध्ये पडून सौ.आहिल्या सुनिल बनगर वय 20 वर्षे रा.बनगरवाडी ही मयत झाल्याची घटना घडली
या घटनेबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली बातमी अशी बनगरवाडी ता.माण जि.सातारा गावचे हद्दीत औढा नावचे शिवारात स्मशानभुमी जवळील सातकी जाणारे कच्यारोडचे जवळील श्रीमंत रंगनाथ बनगर रा.बनरगरवाडी यांचे शेतातील विहरीमध्ये सोमवारी सकाळी माझी पुतणी सौ.आहिल्या सुनिल बनगर वय 20 वर्षे रा.बनगरवाडी ता.माण जि.सातारा ही पाण्यात पडुन बुडुन मयत झाली असल्याची फिर्याद नवनाथ बाबा ढेरे वय 35वर्ष रा.बनगरवाडी ता.माण यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि सखाराम बिराजदार यांनी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मयत महिलेचा पंचनामा केला अधिक तपास सपोनि सखाराम बिराजदार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर के फडतरे करत आहेत