माणगंगा शैक्षणिक संकुलात बाल बाजार व हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड, :
माणगंगा शैक्षणिक संकुल, मासाळवाडी येथे विद्यार्थ्यांना आर्थिक आणि व्यावहारिक ज्ञान मिळवण्यासाठी बाल बाजार आणि महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका आणि कार्यक्रमाच्या अध्यक्ष, डॉ. सौ. सविता वसंत मासाळ मॅम यांच्या हस्ते झाले. तसेच, प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. राजश्री नितीन दोशी (भाभी) उपस्थित होत्या.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पालेभाज्या, फळभाज्या, खाऊ पदार्थ आणि इतर वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. या बाल बाजाराचा लाभ विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घेतला. गावातील महिला, विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासाळवाडीचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
याशिवाय, महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात अध्यक्ष व प्रमुख पाहुण्या तसेच शिक्षिकांनी उत्साहात सहभाग घेतला. बाल बाजारातून विद्यार्थ्यांना आर्थिक ज्ञान मिळवण्याची महत्त्वाची शिकवण दिली जाते, असे माजी नगराध्यक्ष श्री. नितीन दोशी (भाऊ) यांनी सांगितले.
कार्यक्रमाची समाप्ती सर्व विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानून करण्यात आली. संस्थेच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वीपणे बाल बाजार आयोजन केले.