मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ हजार ३५२ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण!

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
फलटण – प्रतिनिधी

माणदेशाला दुष्काळमुक्त आणि औद्योगिक दृष्ट्या प्रगत करण्याचा संकल्प”

       फलटण शहरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   यांच्या हस्ते तब्बल ₹१,३५२ कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे ऑनलाइन भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यामध्ये नीरा देवघर प्रकल्पाच्या उजवा कालवा टप्पा २, प्रशासकीय व महसूल भवन, नवीन पालखी मार्ग, पोलीस ठाणे इमारती, रस्ते बांधकामे** यांचा समावेश आहे.

       फलटण-शिंगणापूर रस्त्यावरील नाईकबंबवाडी MIDC वसाहतीत आयोजित भव्य शेतकरी मेळावा आणि उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणाले –

     “फलटण ही केवळ औद्योगिक नाही तर सांस्कृतिक भूमी आहे. दुष्काळाशी झुंज देणाऱ्या माणदेशाला हिरवाईची किनार देणे, हा आमचा ध्यास आहे. नीरा देवघर आणि इतर प्रकल्पांमुळे हा परिसर लवकरच दुष्काळमुक्त होईल.”

फलटण येथे आयोजित भूमिपूजन, उद्घाटन कार्यक्रमात व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुलदादा कुल, फलटणचे आमदार सचिन पाटील, माळशिरसचे मा.आमदार राम सातपुते, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार सचिन पाटील, मनोज घोरपडे, सातारा जिल्हा बँकेचे संचालक युवानेते शेखर भाऊ गोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले,

      “नीरा देवघर, जिहे-कटापूर, टेंभू अशा योजनांमुळे सांगोला, माळशिरस, फलटण या भागात पाणी पोहोचले आहे. आता आणखी २२ गावांना पाणी मिळणार आहे. उजवा कालव्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाला की १२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.”

      शासनाने या परिसरासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता, सौरऊर्जेवर आधारित उपसा योजना आणि शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

       मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाईकबंबवाडी येथील MIDC वसाहतीत ‘मेगा औद्योगिक प्रकल्प’ देण्याची घोषणा केली. यामुळे शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच फलटण विमानतळाच्या सर्वेक्षणानंतर पुढील टप्प्याचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

  फलटण परिसरासाठी आज ज्या योजनांचे भूमिपूजन किंवा लोकार्पण झाले त्यामध्ये:
*नीरा देवघर उजवा कालवा (टप्पा २) – ₹९६७ कोटी
*प्रशासकीय भवन – ₹१८.६९ कोटी
*महसूल भवन – ₹९.७५ कोटी
*नवीन पालखी मार्ग (कॉंक्रिट) – ₹७५ कोटी
*PMGSY अंतर्गत ३ रस्ते – ₹२० कोटी
*एमएसआयडीसी रस्ता (फलटण–गिरवी) – ₹१९८ कोटी
*पोलीस ठाणे इमारती (३ ठिकाणी) – ₹१२.२८ कोटी प्रत्येकी
*८७ पोलीस निवासी इमारती – ₹२७.११ कोटी

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “या १,४०० कोटींच्या प्रकल्पांमुळे शेती, उद्योग आणि नागरिक सेवा सर्व क्षेत्रात नवचैतन्य येईल

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे म्हणाले:

“नीरा देवघर प्रकल्पाने माण, खटाव आणि फलटण तालुक्यांच्या दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय मिळेल. शासनाने औद्योगिक व जलसंपन्न माणदेश निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.”

कार्यक्रमादरम्यान विविध शासकीय योजनांचे लाभार्थी — घरकुल, पीकविमा, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, बचत गट यांचा सन्मान आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *