व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसळा – सुशील यादव पनवेल कडून म्हसळायेथे सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचा घोणसे घाटाचे उतार वळणावर भिषण अपघात झाला. अपघातांत ट्रक भरधाव आसल्याने रस्त्यालगतच्या एका मोरीला घासुन डोंगरावर आदळल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलीस नाईक एस.ए.विघ्ने यानी अपघाताची माहीती दिली असता ट्रक क्रमांक एमएच.०८- एफ.२४२० हा घोणसे घाटांतील केळे चीवाडी हद्दीतील तीव्र उतार आणि शिघ्र वळणावर चालकाचे भरधाव गाडी वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.अपघातात ट्रकचे भयंकर नुकसान झाले.अपघाताची म्हसळा पोलीसानी २३/२०२४ भा.द.वि.२७९,४२७,मो. वा.का.कलम १८४ प्रमाणे नोंद केली आहे.अपघाताचा अधिक तपास पोलीस नाईक विघ्ने सपोनी पवन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.