श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत- ॲड.कुणाल बोडके
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी, (ता. माण) श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त 18 एप्रिल रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन दहिवडी नगरपंचायतीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश जाधव यांनी दहिवडी-गोंदवले रस्त्या लागत केले आहे. तरी सर्व बैलगाडा मालक, चालक यांनी सहभागी व्हा असे आव्हान ॲड.कुणाल बोडके यांनी केले आहे.
यावेळी या बैलगाडी शर्यती मध्ये पंच राजू जाधव,विजय जाधव, शंकर मुळिक, धनाजी गोसावी, सूरज कदम असणार आहेत. तर झेंडा दर्शक आनंद जगदाळे सर, समालोचक विकास जगदाळे, लालासो ढवाण हे काम पाहणार आहेत. पहिले बक्षीस ५१ हजार ५१ रु., दुसरे बक्षीस ३१ ह्जार ३१ रु., तिसरे बक्षीस २१ ह्जार २१ रु., चौथे बक्षीस १० हजार १० रु. पाचवे बक्षीस ५ ह्जार५० रु. असणार आहे. व मानाच्या ढाली दिल्या जाणार आहेत. सिद्धनाथ यात्रेनिमित्त गेल्या दहा ते बारा वर्षापासून बंद झालेल्या बैलगाडा शर्यतीला पुन्हा एकदा जोमाने सुरुवात केली असल्याचे ॲड. बोडके यांनी सांगितले.
बैलगाडा शर्यत शौकीनांनी ही शर्यत पाहायला यावे तसेच इतर जिल्ह्यातूनही या शर्यतीसाठी बैलगाडा मालक आणि शौकिनांनी या शर्यतीला आपली उपस्थिती लावावी. कोणत्याही बैलगाडी मालकावर या मैदानात अन्याय होणार नाही .सर्व मैदान हे रितसर आणि परदर्शक पणे पार पाडले जाईल. असे मत ॲड.कुणाल बोडके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.