म्हसवड पालिकेत भाजपची महासत्ता : विरोधक सपशेल साफ, २१ पैकी २१ जागांवर भगवा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड – प्रतिनिधी
म्हसवड नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच संपूर्ण शहर भगवामय बनले. मतदानाच्या पहिल्याच फेरीत आघाडी घेतलेल्या भाजपने एकही प्रभाग न गमावता सर्व २१ जागांवर विजय मिळवत विरोधकांना एकतर्फी पराभूत केले. नगराध्यक्ष पदावरही भाजपच्या पूजा सचिन विरकर यांनी तब्बल ४८४४ मतांनी विजय मिळवत प्रचंड आघाडी घेतली.

२१ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात होते. खुल्या महिलांसाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी पूजा सचिन विरकर (भाजप), भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने (सिध्दनाथ नागरिक आघाडी) आणि रुपाली वाल्मिक सरतापे (बसपा) या उमेदवारांमध्ये लढत होती. पहिल्या फेरीपासूनच पूजा विरकर यांच्या मतांची आघाडी सतत वाढत गेली आणि अखेरीस ४८४४ मतांच्या विक्रमी फरकाने त्या विजयी ठरल्या.

प्रभागनिहाय मिळालेले निकाल (सर्व भाजप विजयी)
प्रभाग १ –
अ) चैताली अनिल शिंदे – ४७८
ब) विजय रामचंद्र धट – १६३
प्रभाग २ –
अ) सतीश शिवाजी मासाळ – ३४६
ब) सविता वसंत मासाळ – ३९१
प्रभाग ३ –
अ) लखन मारुती लोखंडे – ५२०
ब) दिपाली धनंजय शिंदे – ३०९
प्रभाग ४ –
अ) माधुरी महेश लोखंडे – १३८
ब) अकिल मैनुद्दीन काझी – ३३५
प्रभाग ५ –
अ) श्रीदेवी निषांत पिसे – ९९९
ब) प्रज्योत किरण कलढोणे – १२२३
प्रभाग ६ –
अ) आकाश बाळासाहेब पानसांडे – १७०
ब) स्नेहल युवराज सूर्यवंशी – १६०
प्रभाग ७ –
अ) प्रमिला जयंत ढाले – २३६
ब) युवराज दिनकर सूर्यवंशी – ४९०
प्रभाग ८ –
अ) अरुणा महेश गायकवाड – ५८६
ब) महावीर गिरजाप्पा विरकर – ४९९
प्रभाग ९ –
अ) पुनम नारायण विरकर – ५०८
ब) विजय रामचंद्र बनगर – ५१४
प्रभाग १० –
अ) स्वाती दिपक बनगर – ५९१
ब) अभिषेक आप्पा विरकर – ४६९
जयकुमार गोरे यांची रणनीती ठरली गेमचेंजर
निवडणूक जाहीर झाल्यापासूनच ग्रामविकासमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानत प्रचारात स्वतःचे संपूर्ण योगदान दिले.
“२१/० करुनच सत्ता मिळवणार” हा त्यांचा शब्द अक्षरशः खरा ठरला. प्रत्येक प्रभागात केलेल्या नियोजनाचा परिणाम म्हणजे विरोधकांना एकही जागा मिळाली नाही.

शेखर गोरे यांच्या पाठिंब्याने समीकरण बदलले

गत निवडणुकीत विरोधात लढलेले जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांची यंदाची एकजूट भाजपच्या विजयात महत्त्वाची ठरली. शेखर गोरे यांनी आपल्या उमेदवारांना माघारी घेण्याचे आवाहन करत पूर्ण पाठिंबा दिल्यामुळे भाजपचा विजय आणखी भक्कम झाला.

विजयानंतर शहरात जल्लोष

सर्वच उमेदवार विजयी ठरल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, आतषबाजी आणि जल्लोषाने संपूर्ण शहर दुमदुमून सोडले.

म्हसवड पालिकेच्या इतिहासात प्रथमच असा एकतर्फी विजय नोंदवला गेला असून, भाजपने केलेली ‘व्हाईट वॉश’ कामगिरी राजकीय पटलावर मोठी चर्चा ठरत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *