सहाय्यक सेवाभावी संस्थेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले -प्रतिनिधी :
     सहाय्यक सेवाभावी संस्था खटाव तालुका मिरज जिल्हा सांगली सामाजिक बांधिलकी स्वीकारून 2005 पासून सामाजिक बांधिलकी स्वीकारून समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी,स्त्रियांना समाजामध्ये मान सन्मान मिळण्यासाठी,तरुण पिढी व्यसनमुक्त राहण्यासाठी,मागास व दुर्बल घटक यांना एकत्रित करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रामुख्याने सहाय्यक सेवाभावी संस्थेमार्फत काम करण्यात येत आहे.

     डॉ.बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारधाराप्रमाणे कसे वागले पाहिजे, कसे जपले पाहिजे याविषयी जनजागृती चे काम देखील संस्थेमार्फत करण्यात येत आहे.विशेष करून मागास व दुर्बल घटकांमधील तरुण पिढी दारू,तंबाखू, गुटखा,गांजा,मावा,सिगारेट,चरस इत्यादी व्यसनाधींच्या आहारी जाऊन आपल्या अनमोल जीवन उद्ध्वस्त करून घेत आहेत,त्यांचे जीवन व्यसनमुक्त राहण्यासाठी संस्थेमार्फत व्यसनमुक्तीचे चळवळ हाती घेऊन काम करण्यात येत आहे.

      याच कामाचा विचार करून महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2022-23 यावर्षाच्या पुरस्कारामध्ये सहाय्यक सेवाभावी संस्थेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मा. ना.श्री.एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री) महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्री.अजित पवार (उपमुख्यमंत्री) महाराष्ट्र राज्य,मा.ना.श्री.संजय बनसोडे (क्रीडा मंत्री) महाराष्ट्र राज्य,मा.ना. श्री.संजय सावकारे (आमदार) मा.श्री. सुमंत भांगे (सचिव ) समाज कल्याण विभाग, मा.श्री.ओमप्रकाश बकोरिया (आयुक्त) समाज कल्याण विभाग पुणे,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सहाय्यक सेवाभावी संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
        पुरस्कार स्वीकारताना सहाय्यक सेवाभावी संस्थेचे (अध्यक्ष) व तंबाखूमुक्त शाळेचे जिल्हा समन्वयक श्री.रवींद्र कांबळे (सचिव) सौ.ज्योती राजमाने,श्री.बबन कुंभार (सदस्य) श्री.पोपट कांबळे (सदस्य) श्री.महादेव कांबळे सौ.मालन कांबळे देखील उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!