दहिवडी शहरात जयकुमार गोरे यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान मुस्लिम समाजाचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)

दहिवडी
माण – खटाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचार दौऱ्याचा उत्साह चांगलाच वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दहिवडी शहरातील नागरिकांसोबत आयोजित संवाद बैठकीत विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवून शहरातील मुस्लिम समाज बांधव, माता-भगिनी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी सौ. सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेणाऱ्या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले. त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विकासासाठी भाजपाच्या कार्याची प्रशंसा केली. जयकुमार गोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी येत्या 20 तारखेला निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजयी करण्यासाठी ‘कमळ’ चिन्हासमोर मतदान करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात मान्यवरांमध्ये मा. सभापती अतुलदादा जाधव, संदीप जाधव यांच्यासह अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांचे आभार मानत जयकुमार गोरे यांनी दहिवडी शहराला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली खटाव विधानसभा मतदारसंघात विकासकामांची गती वाढणार असल्याचा विश्वास नव्याने पक्षात सामील झालेल्या नागरिकांनी व्यक्त केला.

जयकुमार गोरे यांचा प्रचार दौरा सध्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत असून, भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!